एका मुलीने तिच्या अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये मुलीने ही अनोखी प्रेमकहाणी शेअर केली. तिने सांगितलं की तिच्य घरात एका मांजरीला सशासोबत रोमान्स करताना पकडलं होतं. पण यामुळे मांजर गर्भवती झाली तेव्हा तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं. या विचित्र गर्भधारणेनंतर मांजर खूपच आक्रमक झाली. मांजरीने बाळांना जन्म दिल्यावर आश्चर्याची सीमा ओलांडली गेली. मुलाला पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.
advertisement
20 पुरुषांशी लग्न, तरी महिला व्हर्जिन, सुहागरातची ती स्टोरी
मुलीने सांगितलं की, एके दिवशी ती अचानक घरी आली तेव्हा तिला दिसलं की तिची मांजर आणि ससा संबंध ठेवत आहेत. यानंतर मांजर खूप चिडचिड करू लागली. ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. जेव्हा मांजरीने दोन महिन्यांनी बाळांना जन्म दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हे मूल मांजरीसारखे दिसत होतं पण त्याची चाल सशासारखी होती.
हा व्हिडीओ पाहून आणि स्टोरी ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले होते, जेव्हा अचानक सत्य बाहेर आलं. अनेकांनी कमेंट्समध्ये त्याची सत्यता उघड केली. व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणारी मांजर नंतर दिसणाऱ्या मांजरीपेक्षा वेगळी होती. तसंच, हे जैविकदृष्ट्या शक्य नाही. ससा कधीही मांजरीला गर्भवती करू शकत नाही. दोघांचे गुणसूत्र वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत हे अशक्य आहे. याचा अर्थ असा की मुलीने ही खोटी कहाणी फक्त व्हायरल होण्यासाठी शेअर केली.