पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या गायब झाल्या, त्यानंतर फार्मच्या बेसमेंटमधूनही आवाज येऊ लागला. फार्मचे ऑपरेटर यशवंत सिंह यांनी तिथं शोध घेतला. तर तिथं चक्क भलामोठा अजगर होता. जो दररोज अनेक कोंबड्या गिळंकृत करत होता.
बापरे! जिवंत झिंगा खायला गेली पण झिंग्यानेच तिला 'खाल्लं', Shocking Video
जंगलातून भटकणारा हा अजगर, ज्याने पोल्ट्री फार्मच्या बेसमेंटला आपलं कायमचं घर बनवलं होतं. फार्मच्या ऑपरेटर आणि कामगारांना या घटनेची माहितीही नव्हती. पोल्ट्री फार्ममध्ये स्वतःसाठी पुरेसे अन्न शोधून काढत, अजगराने तिथेच आपले कायमचे घर बनवले. . हळूहळू, अजगराने तिथे ठेवलेल्या कोंबड्यांना आपले अन्न बनवायला सुरुवात केली. कोंबड्यांची संख्या कमी झाल्यावर, ऑपरेटर यशवंत सिंग यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली.
advertisement
ऑपरेटर यशवंत सिंग यांनी ताबडतोब वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. वन कर्मचारी येण्यापूर्वीच शेत मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अजगराला पोत्यात बांधून ठेवलं होतं. अजगर भरलेलं पोतं पथकाला देण्यात आलं. त्यांनी वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात त्या अजगराला सोडलं.
जयमती गेली कुठे? रस्त्यावरून चालताना हत्ती अचानक गायब, किंमत 1 कोटी
वन्यजीव तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पावसाळ्यात अजगरांसह अनेक सरपटणारे प्राणी वाहून जातात आणि निवासी भागात पोहोचतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांचा हेतू नसतानाही ते मानवांशी समोरासमोर येतात. दिलासा देणारी बाब म्हणजे अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी, वन कर्मचारी 24 तास तैनात असतात, जे कठीण परिस्थितीत त्वरित बचाव कार्य करतात.
अजगराच्या सुटकेनंतर वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं आहे की जेव्हा त्यांना वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो तेव्हा संयम ठेवावा आणि कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी वेळ काढून वन विभागाला कळवावं, जेणेकरून कोणतेही नुकसान न होता बचाव कार्य पूर्ण करता येईल.