मीना खानूम नावाच्या महिलेची ही कहाणी. इराणच्या एका दुर्गम भागात वाढली. ती 12 वर्षांची होती तेव्हा तिचं लग्न झालं. तिचा नवरा 30 वर्षांचा होता. मीना म्हणाली, 'माझे आईवडील अशिक्षित होते आणि त्यांना काहीही समजत नव्हतं. त्यावेळी अनेक गरीब आणि अशिक्षित कुटुंबे त्या वयात त्यांच्या मुलींचे लग्न लावून देत असत."
हा PHOTO काढला त्यानंतर संपूर्ण कुटुंबं संपलं, नेमकं काय घडलं?
advertisement
जेव्हा ती लहान होती तेव्हा तिची आई तिला झोपवायची आणि झोपल्यानंतर तिचा नवरा खोलीत यायचा. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मीना तिच्या पहिल्यांदा प्रेग्नंट झाली. तिला तो क्षण अजूनही स्पष्ट आठवतो. पहिल्यांदा जेव्हा तिला तिच्या पोटात काहीतरी हालचाल जाणवली तेव्हा ती घाबरली आणि रडू लागली. ती तिची वहिनी शिरीनकडे धावत ओरडत गेली. म्हणाली, 'माझ्या पोटात उंदीर घुसला आहे'. 4 वर्षांनंतर तिने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
मीना फक्त 19 वर्षांची असताना तिच्या पतीचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर तिला कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. तिने आपल्या मुलांना वाढवण्यासाठी दिवसरात्र काम केलं. मीनाला पुन्हा लग्न करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण बहुतेक पुरुषांनी तिच्या दोन्ही मुलांना सोडून जाण्याची अट तिच्यावर घातली. मीना म्हणाली, "माझं आयुष्य चांगलं असू शकलं असतं हे खरं आहे. पण माझ्याशी लग्न करू इच्छिणारे पुरुष मला माझ्या मुलांपैकी आणि त्यांच्यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडत होते." अशा परिस्थितीत तिने तिच्या मुलांना प्राधान्य दिलं.
5 प्रश्न विचारले, एकाचंही उत्तर आलं नाही, व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं प्रकरण काय?
इराण-इराक युद्धादरम्यान तिला एका लष्करी रुग्णालयात नोकरी मिळाली. पुढील चार वर्षे तिने रुग्णांची काळजी घेण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्व काही केलं. युद्धानंतरही मीनाने तिचं काम सुरू ठेवलं आणि उत्तर तेहरानमधील श्रीमंत कुटुंबांसाठी स्वच्छता आणि मुलांची काळजी घेतली. मीनाची दोन्ही मुलं बिजान आणि हुशांग आता मोठे झाले आहेत आणि इराणमध्ये काम करतात. पण ते त्यांचं विद्यापीठ शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.
बालविवाहाची ही वेदनादायक कहाणी एका पत्रकाराद्वारे जगासमोर आली. प्रसिद्ध पत्रकार तारा कांगारलू यांनी त्यांच्या 'द हार्टबीट ऑफ इराण' इराणच्या सर्वात गरीब भागात राहणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांपासून ते तेहरानमध्ये राहणाऱ्या एका ट्रान्सजेंडर महिलेपर्यंतच्या कथा आहेत, ज्या त्यांच्या जीवनातील अडचणींवर प्रकाश टाकतात आणि मीनाची कहाणी त्यापैकी एक आहे.