ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील दहिसाही गावातील ही घटना. एका मातीच्या घरात कोब्रा घुसला. त्यावेळी घरातील मालक मच्छरदाणी लावून झोपला होता. साप या मच्छरदाणीत घुसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सापाने त्या व्यक्तीवर हल्ला केला नाही तर तोसुद्धा त्याच्या बाजूला झोपला. व्यक्तीला जाग आली. त्याने सापाला पाहिलं पण तोसुद्धा शांत राहिला. ना सापाने त्याला काही केलं ना त्याने सापाला. त्याने त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला वन विभागाच्या बचाव पथकाला बोलवण्यास सांगितलं. सर्पमित्र लगेच त्याच्या घरी पोहोचले.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार बचाव पथकाने ताबडतोब प्रशिक्षित कृष्णा गोछायत यांना कळवलं, ते घरी पोहोचले. त्यांनी पाहिलं की कोब्रा आणि घरमालक शेजारी शेजारी झोपले होते, जे या प्रकरणात कोब्राच्या आक्रमक नसलेल्या वर्तनाचा पुरावा होतं. ही घटना पहाटे घडली आणि वन विभागाने त्या माणसाला आणि सापाला सुखरूप वाचवलं.
बचावकर्त्याने सांगितलं की त्याने प्रथम घरमालकाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आणि प्रथम काळजीपूर्वक त्याला बाहेर काढलं. नंतर तो कोब्राला वाचवण्यासाठी मच्छरदाणीत शिरला आणि काही वेळाने त्याला यशस्वीरित्या पकडलं.
Snake Facts : खतरनाक किंग कोब्रा कुणाला घाबरतो? आहे छोटासा जीव, पण भिडला तर साप तडफडून मरतो
वन विभागाच्या म्हणण्यानुसार, अलिकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे साप त्यांच्या अधिवासातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणे शोधत आहेत. जरी कोब्रा सहसा मानवांशी सामना करणे टाळतात, परंतु जर त्यांना धोका किंवा कोपऱ्यात अडकल्यासारखं वाटलं तर ते स्वसंरक्षणार्थ हल्ला करू शकतात. हे वर्तन एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, कारण संभाव्य धोक्याचा सामना करताना साप स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.