Snake Bite : मुलाला चावला कोब्रा साप, नंतर तो बराही झाला, पण 8 तासांनी जे घडलं ते भयंकर, डॉक्टरही घाबरले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Snake Bite News : ज्या ठिकाणी नागाने चावा घेतला होता त्या ठिकाणी सूज आली होती. विषाने त्वचा आणि स्नायूंमध्ये एक कृत्रिम पिशवी तयार केली होती. तिथून विष रक्तात शिरत होतं.
लखनऊ : साप चावल्याची बरीच प्रकरणं आहेत. साप चावल्यानंतर वेळेत आणि योग्य उपचार मिळाले तर रुग्ण बरा होतो. असाच एक 7 वर्षांचा मुलगा ज्याला साधासुधा नव्हे तर किंग कोब्रासारखा सगळ्यात विषारी साप चावला. त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले आणि तो बराही झाला. पण त्यानंतर 8 तासांनी त्याच्यासोबत जे घडलं, त्याचा विचार कुणीच केला नव्हता.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील ही घटना आहे. झंगहा येथील एका सात वर्षांच्या मुलाला कोब्रा साप चावला. सापाने त्याच्या डाव्या पायाला दंश केला. तो बेशुद्ध झाला, त्यानंतर कुटुंबाने बेशुद्ध अवस्थेतच त्याला तातडीने एम्समध्ये दाखल केलं.
बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीष कुमार म्हणाले की, मुलाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचा श्वास जवळजवळ थांबला होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याक आलं. अँटी- स्नेक विषाच्या 10 कुपी इंजेक्शन देण्यात आल्या. 4 तासांनंतर त्याच्या रक्तातील विषाचा परिणाम कमी झाला. रात्री 12 वाजेपर्यंत मुलगा बोलू लागला.
advertisement
तीन दिवसांच्या उपचारानंतर मूल पूर्णपणे निरोगी झालं, त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पण बरं झाल्यानंतर दोन तासांनी मुलाची प्रकृती पुन्हा बिघडू लागली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला पुन्हा व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावं लागलं. ज्या ठिकाणी नागाने चावा घेतला होता त्या ठिकाणी सूज आली होती. विषाने त्वचा आणि स्नायूंमध्ये एक कृत्रिम पिशवी तयार केली होती. तिथून विष रक्तात शिरत होतं.
advertisement
उपचारानंतरही त्या मुलाच्या शरीरात विषाचा परिणाम पुन्हा दिसून आला. दुसऱ्या हल्ल्यात विषाचा परिणाम अधिक घातक होता. डॉक्टरांच्या मते, कोब्रा चावल्यानंतर विष एकाच वेळी संपूर्ण शरीरात पसरतं असं नाही. उपचारानंतरही विष पुन्हा त्याचा परिणाम दाखवू शकतं.
डॉ. मनीष यांच्या मते, जगात सर्पदंशामुळे विष पुन्हा हल्ला करण्याची प्रकरणं दुर्मिळ आहे. एम्समध्ये ही पहिलीच घटना होती. त्या मुलाला सर्पदंशविरोधी विषाच्या 10 कुपी टोचण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी आणखी पाच कुपी टोचण्यात आल्या. डॉक्टरांनी मुलावर उपचार करण्यात यश मिळवलं.
advertisement
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार हे प्रकरण नोव्हेंबर 2024 सालातील आहे. जे इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालं आहे.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
August 15, 2025 8:54 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Snake Bite : मुलाला चावला कोब्रा साप, नंतर तो बराही झाला, पण 8 तासांनी जे घडलं ते भयंकर, डॉक्टरही घाबरले


