कोविशिल्ड लस तयार करणारी कंपनी अॅस्ट्राझेनकानं कोर्टात कागदपत्रं सादर केली आहेत. ज्यात कंपनीनं पहिल्यांदाच कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत कबुली दिली आहे. कोविड-19 लशीमुळे रक्त गोठण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात, असं कंपनीनं सांगितलं आहे. पण या दुष्परिणामांच्या प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
बापरे! हा कसला विचित्र आजार! रुग्णाला डॉक्टरही म्हणाले, 'गुगलवरच शोधा'
advertisement
कोरोना लशीविरोधात खटला
डेली मेलच्या वृत्तानुसार, अनेक कुटुंबांनी कोरोना लशीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता, त्यापैकीच एक म्हणजे जेमी स्कॉट नावाची व्यक्ती. ज्याने ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध खटला दाखल केला होता. एप्रिल 2021 मध्ये त्यानं कोरोना लशीचा डोस घेतला, त्यानंतर त्याला कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झालं. जेमी स्कॉटसह इतर अनेक रुग्णांना TTS सोबत थ्रोम्बोसिस नावाचं दुर्मिळ लक्षण होतं. त्यांनी या लस उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली.
कंपनीनंही दिली दुष्परिणामांची कबुली
त्यानंतर औषध कंपनीने न्यायालयात कबूल केलं की या लशीमुळे आरोग्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये यूकेच्या न्यायालयात कंपनीनं कायदेशीर दस्तऐवज सादर केले. त्यात कंपनीनं म्हटलं की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकतं. या स्थितीत प्लेटलेट कमी होणं आणि रक्त गोठणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
प्रेमात जडला विचित्र आजार! 18 वर्षांच्या पोरीला झाला 'लव्ह ब्रेन'; बॉयफ्रेंडला दररोज...
कोरोना महासाथीच्या काळात यूकेतील फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्राझेनकाने ऑक्सफोर्डच्या मदतीनं कोविड लस तयार केली होती. भारतात लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने अॅस्ट्राझेनकाशी करार करून ही लस भारतातच तयार केली होती. यानंतर देशातील निम्म्याहून अधिक लोकांना कोविशील्ड लस दिली गेली.