प्रेमात जडला विचित्र आजार! 18 वर्षांच्या पोरीला झाला 'लव्ह ब्रेन'; बॉयफ्रेंडला दररोज...

Last Updated:

प्रेमात 18 वर्षीय तरुणीला असा विचित्र आजार जडला की कुणी विचारही केला नसेल. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करायची वेळ आली.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही प्रेमात लोक वेडे झाल्याचे, प्रेमात हार्ट ब्रेक झाल्याचं ऐकलं असेल, पाहिलं असेल अनुभवलं असेल. पण कधी लव्ह ब्रेनबाबत ऐकलं तरी होतं का? प्रेमात पडलेल्या एका 18 वर्षीय मुलीला लव्ह ब्रेन झाला आहे. बॉयफ्रेंडसोबत तिनं असं काही केलं की तिला हा विचित्र आजार झाला आहे. चीनमधील ही धक्कादायक घटना आहे.
शिओयू असं या तरुणीचं नाव. ती रिलेशनशिपमध्ये होती. पण याच रिलेशनशिपमुळे तिला असा आजार झाला ज्याचा कुणी विचारही केला नसेल. युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षात असल्यापासून ती विचित्र वागू लागली. त्यानंतर एक दिवस असं काही घडलं की तिचा बॉयफ्रेंडही घाबरला, त्याने पोलिसात धाव घेतली. यानंतर शियोयूला हॉस्पिटलमध्ये दाखल करायची वेळ आली.
advertisement
बॉयफ्रेंडसोबत विचित्र वागत होती शियोयू
शियोयू पूर्णपणे तिच्या बॉयफ्रेंडवर अवलंबून होती. त्यानं सतत आपल्याशी बोलावं असा तिचा अट्टाहास असायचा. तो काय करतो, कुठे जातो, त्याच्याबाबत प्रत्येक माहिती तिला हवी असायची. तिच्या या वागणुकीमुळे तिच्या बॉयफ्रेंडला कुणीतरी बांधून ठेवल्यासारखं, कोंडल्यासारखं वाटायचं. त्याची घुसमट होत होती. तिच्या अशा वागण्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला.
advertisement
एका दिवसात 100 कॉल
एक दिवस तर शियोयूनं हद्दच केली. तिनं आपल्या बॉयफ्रेंडला फोन केले. ते फोन त्याने रिसीव्ह केले नाही. पण तरी ती फोन लावत राहिली. एकाच दिवसात तिनं त्याला 100 पेक्षा अधिक वेळा कॉल केला. त्यानंतर ती अत्यंत अस्वस्थ झाली. घरातील वस्तूंची तोडफोड करू लागली. तेव्हा मात्र तिचा बॉयफ्रेंडही घाबरला. त्यानं पोलीस ठाणं घातलं. शियोयुनं आत्महत्येचीही धमकी दिली. बाल्कनीतून उडी मारत असल्याचं ती आपल्या बॉयफ्रेंडला सांगत होती. तेव्हाच पोलीस तिथं आले.
advertisement
तपासात विचित्र आजाराचं निदान
तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिची तपासणी केली असता तिला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं निदान झालं. या तरुणीवर उपचार करणारे डॉ. डू ना म्हणाले.  बॉर्डलाइन पर्सनलिटी डिसॉर्डर कधी कधी चिंता, नैराश्य, बायपोलार डिसऑर्डर अशा समस्यांसह उद्भवू शकतं. असा परिस्थितींचा संबंध हा बालपणातील वाईट अनुभवांशी संबंधित असू शकतो. या तरुणीला जी समस्या आहे, त्याला वैद्यकीय टर्म नाही. पण रोमान्टिक रिलेशनशिपमध्ये उद्भवलेल्या या समस्येला लव्ह ब्रेन असं म्हणतात.
advertisement
लव्ह ब्रेनचं कारण काय?
शिओयूच्या आजाराचं नेमकं कारण त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या लोकांचं बालपणात त्यांच्या पालकांसोबत चांगलं नातं नव्हतं. अशा लोकांमध्ये बऱ्याचदा असं होतं, असं ते म्हणाले. काही प्रकरणांमध्ये भावनिक आधार देऊन या समस्येतून लोकांना बाहेर काढता येतं. पण शिओयूसारख्या गंभीर प्रकरणांत वैद्यकीय उपचारांची गरज पडते, असं ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रेमात जडला विचित्र आजार! 18 वर्षांच्या पोरीला झाला 'लव्ह ब्रेन'; बॉयफ्रेंडला दररोज...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement