स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनसाठी गेलेलं हे कपल सीहॉटेल श्वार्ट इथं राहिले. त्यावेळी कडक ऊन होतं. पण त्यांच्या रूममध्ये एसी काय पंखाही नव्हता. त्यांनी हॉटेलमधून पंखा मागितला तेव्हा त्यांना एक छोटा पंखा देण्यात आला. नंतर कपलनेच जवळच्या दुकानातून दुसरा पंखा भाड्याने घेतला. पण दुसऱ्या दिवशी हॉटेलचा पंखा त्यांना न कळवता खोलीतून काढून टाकण्यात आला.
advertisement
मग रात्री त्या जोडप्याने रिसेप्शनवर फोन केला. त्यानंतर एक कर्मचारी आला. पण त्याने माफी मागण्याऐवजी त्या जोडप्याशी भांडायला सुरुवात केली आणि त्यांना मूर्ख म्हटलं. त्यानंतर हॉटेलमधून चेकआउटच्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजी निकिता नाश्त्यासाठी फळं आणायला गेली. यादरम्यान हॉटेलच्या कर्मचाऱ्याने पुन्हा तिच्याशी भांडायला सुरुवात केली.
फक्त गूड मॉर्निंग, गूड नाइट म्हणून लाखो रुपये मिळतात, कसं काय? महिलेचा जबरदस्त फंडा
त्यावेळी हॉटेलमधील एक कर्मचारी करणजवळ आला. निकिताला वाटलं की तो करणवर हल्ला करणार आहे. भीतीने निकिताने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. त्यानंतर कर्मचाऱ्याने जोडप्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्याने निकितावर एक जड सिरेमिक मग फेकला, ज्यामुळे तिचा 1 दात तुटला आणि 11 दात हलू लागले. तिच्या जबड्याचं हाड देखील खराब झालं.
करणने सांगितलं की जेव्हा ते मागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कर्मचाऱ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. हल्ल्यानंतर निकिताला एकटीलाच रुग्णालयात जावं लागलं. त्यानंतर जोडप्याला त्यांचे सर्व प्लॅन रद्द करावे लागले.
हे कसं शक्य आहे? हा माणूस मरतच नाही, पुन्हा पुन्हा जिवंत होतो, 6 वेळा दफनभूमीतून परत आला
हॉटेलने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि या जोडप्याला आक्रमक म्हटलं. हॉटेल मालकाने सांगितलं की निकिता आणि करण सुरुवातीपासूनच असभ्य होते. हॉटेलचा दावा आहे की निकिताने कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे रेकॉर्डिंग केलं. जेव्हा तिला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितलं गेलं तेव्हा तिने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हॉटेलच्या म्हणण्यानुसार 60 वर्षीय कर्मचाऱ्याला चेहऱ्यावरून रक्तस्त्राव आणि डोक्याला दुखापत झाली आहे.