हे कसं शक्य आहे? हा माणूस मरतच नाही, पुन्हा पुन्हा जिवंत होतो, 6 वेळा दफनभूमीतून परत आला

Last Updated:

Dead man alive : या व्यक्तीचा 6 वेळा मृत्यू झाला पण सहाही वेळा ती पुन्हा जिवंत परतली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कार अपघात, आजारपण आणि आगीत जळल्यानंतरही तो जिवंत राहिला.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : जीवन आणि मृत्यूवर माणसाचं नियंत्रण नसतं. एकदा हा कुणीचा मृत्यू झाला की तो पुन्हा जिवंत होत नाही. पण काही लोक आपण मृत्यूच्या दारातून परत आल्याचा दावा करतात. अशी काही प्रकरणं आहेत. शिवाय डॉक्टरांच्या चुकीमुळे डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाल्याचीही प्रकरणं आहेत. पण एखादी मृत व्यक्ती पुन्हा पुन्हा जिवंत होते, असं सांगितलं तर... साहजिकच यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण असं एक प्रकरण चर्चेत आलं आहे.
एक व्यक्ती जी जितक्या वेळा मरते, तितक्या वेळा पुन्हा जिवंत होते. या व्यक्तीचा 6 वेळा मृत्यू झाला पण सहाही वेळा ती पुन्हा जिवंत परतली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कार अपघात, आजारपण आणि आगीत जळल्यानंतरही तो जिवंत राहिला. टान्झानियामधील ही व्यक्ती आहे. इम्साईल अजीज असं या व्यक्तीचं नाव.
advertisement
कामाच्या ठिकाणी काम करताना इस्माईलचा पहिल्यांदाच मृत्यू झाला. तो काम करताना जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर इस्माईलचं कुटुंब मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचलं आणि दफनविधीची तयारी सुरू होती, तेव्हा इस्माईल शवपेटीतून बाहेर आला आणि चालायला लागला.
इस्माईलचा दुसऱ्यांदा मृत्यू मलेरियामुळे झाला. यावेळीही त्याच्या दफनविधीची तयारी सुरू होती आणि त्याला एका शवपेटीत बंद करण्यात आलं आणि त्यानंतर तो पुन्हा शवपेटीतून बाहेर आला. तिसऱ्यांदा कार अपघातात इस्माईलचा मृत्यू झाला. अपघातानंतर तो कोमात गेला. डॉक्टरांनी तिसऱ्यांदाही त्याला मृत घोषित केलं, पण इस्माईल पुन्हा जिवंत झाला. चौथ्यांदा त्याला साप चावला आणि लोकांनी त्याला मृत समजून शवपेटीत ठेवलं. पण यावेळी सर्वांनी त्याला शवपेटीत ठेवल्यानंतर तीन दिवस वाट पाहिली, तो पुन्हा जिवंत झाला.
advertisement
इस्माईलच्या जीवन-मृत्यूचे चक्र पाहून आजूबाजूचं लोकही घाबरले. काळाजादू, जादूटोणा, इस्माईचं भूत आहे असं सगळे लोक मानू लागले. याच भीतीतून त्याचं घर जाळून टाकण्यात आलं. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो घरात असताना आग लावण्यात आली. पण इस्माईल या आगीतूनही वाचला. ही त्याची वाचण्याची सहावी वेळ होती.
advertisement
अशाप्रकारे इस्माइलत्या जीवन आणि मृत्यूचं चक्र एकूण सहा वेळा चालू राहिलं. त्याला कुणी शापित मानू लागलं, तर कुणी अमर. आता हे कसं शक्य आहे ते माहिती नाही. पण आता ही व्यक्ती सामान्य माणसासारखी जगू शकत नाही. इस्माईल त्याचं जुनं घर सोडून दूर एका निर्जन ठिकाणी एकटाच राहू लागला. आफ्रिमॅक्स इंग्लिश युट्युब चॅनेलवर या व्यक्तीबाबत माहिती देणारा डॉक्युमेंट्री व्हिडीओ आहे.
advertisement
(हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पुष्टी केलेली नाही. तसंच या लेखात करण्यात आलेल्या दाव्याचं समर्थनही करत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
हे कसं शक्य आहे? हा माणूस मरतच नाही, पुन्हा पुन्हा जिवंत होतो, 6 वेळा दफनभूमीतून परत आला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement