वाढदिवशी खाल्लं चिकन, व्यक्तीचा मृत्यू, तपासात समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man died after eat chicken : वाढदिवसानिमित्त केलेली पार्टी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. ही व्यक्ती वाढदिवशी रिसॉर्टमध्ये गेली. तिनं वाढदिवशी चिकन खाल्लं आणि तिचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : बर्थडे म्हटलं की पार्टी वगैरे आलंच. काही लोक घरातच सेलिब्रेशन करतात तर काही बाहेर जातात. कुणी हॉटेलमध्ये जातं, कुणी रिसॉर्टमध्ये तर कुणी आणखी कोणत्या तरी ठिकाणी. तिथं गेलं की मग वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थही आले. विशेषत: बरेच लोक नॉनव्हेजवर ताव मारतात. अशीच एक व्यक्ती जी तिच्या वाढदिवशी रिसॉर्टमध्ये गेली. तिनं वाढदिवशी चिकन खाल्लं आणि तिचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमधील ही घटना आहे. ग्रेटर मँचेस्टरमधील बोल्टन येथीस लिटिल लेव्हर येथील 70 वर्षांचा लेस्ली ग्रीन आपला 70 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्पेनमधील फुएर्टेव्हेंटुरा येथील 4-स्टार लक्झरी रिसॉर्ट ऑक्सीडेंटल जँडिया प्लेया इथं कुटुंबासह गेला. दुसऱ्या आठवड्यात लेस्ली गंभीर आजारी पडू लागला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला साल्मोनेला संसर्ग झाल्याचं निदान झालं, ज्यामुळे नंतर सेप्सिस (रक्त संसर्ग) आणि मूत्रपिंड निकामी होणं यासारख्या गुंतागुंत निर्माण झाल्या. जवळजवळ 4 आठवड्यांच्या उपचारानंतर 4 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचे अनेक अवयव निकामी झाले ज्यामुळे त्याचं निधन झालं.
advertisement
त्याच ट्रिपवर त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी ज्युली ग्रीनलाही साल्मोनेला संसर्ग झाला आणि तिने एक आठवडा रुग्णालयात घालवला. ज्युली म्हणाली की सुट्टीच्या काळात ते फक्त हॉटेलच्या बुफेमधून जेवले
होते. तिने सांगितलं की एकदा त्यांनी मागवलेलं चिकन कमी शिजलेले होतं. ज्युलीने आरोप केला की तिने हॉटेल कर्मचाऱ्यांना हात धुताना पाहिलं नाही आणि कधीकधी ताजं शिजवलेले अन्न आधीच साठवलेल्या अन्नात मिसळलं जात असे.
advertisement
चिकन चांगलं आहे की नाही हे कसं ओळखायचं?
सर्वात पहिलं म्हणजे चिकनचा वास घेऊन पाहा, त्याच्यातून विचित्र वास येत असेल ते खराब झालेलं असतं. फ्रेश चिकनचा वास सौम्य असतो. खराब चिकनमध्ये तीव्र, आंबट, सडल्यासारखा वास येतो.
चिकनचा रंगही तपासा. चिकन खराब झालं असेल तर त्याचा रंग हलका पिवळा होतो.
चिकन नीट पाहा त्यावर कुठे बुरशी तर नाही ना. बुरशी असेल तर ते चिकन खराब आहे.
advertisement
चिकन शिजवल्यानंतरही ते खराब आहे की नाही ते समजतं. चिकन खराब असेल तर शिजवल्यानंतर ते रबरासारखं लागतं.
Location :
Delhi
First Published :
August 17, 2025 9:26 AM IST