घरातील लोक तयार नसतील तर कपल बऱ्याचदा लपून-छपून भेटतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला मात्र त्या दोघांना तरुणीच्या आईनं पकडलं. तिनं दोघांनाही चांगलाच चोप दिला.
आई-वडिलांचा तो निर्णय आणि आता मुलगी कुत्र्यासारखी भुंकते 4 पायांवर चालते! नक्की हे प्रकरण काय?
advertisement
कपलचा विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी घराच्या टेरेसवर उभी आहे तिच्या बाजूला तिची आई दिसत आहे. काही वेळातच तरुणीची आई लपलेल्या बॉयफ्रेंडला समोर आणते आणि चोप देते. ती त्याला चप्पलही मारते तेवढ्या तो तेथून पळून जातो. मग ती स्वतःच्या मुलीलाही मारते. तिलाही चांगलाच चोप देते.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे चा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला मात्र त्यांचा प्लॅन बिघडला आणि त्यांची धुलाई झाली.
@HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. काहीच वेळात व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत.
