दहीहंडी, गणपतीच्या काळात गर्दीत लहान मुलांना खांद्यावर, डोक्यावर बसवून ते दाखवणं काही नवीन नाही. गर्दीत लहान मुलांना काही दिसत नाही, शिवाय ते चिरडण्याची शक्यता असते. म्हणून पालक त्यांना आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलांच्या खांद्यावर असंच बसून दहीहंडी, गणपती पाहिले असतील आणि आता तुमच्या मुलांनाही तुम्ही असंच दाखवत असाल. मुलांनाही आनंद होतो. पण याचा धोका आहे, जो अनेकांना माहिती नाही.
advertisement
माणसाच्या शरीराचा हा अवयव आयुष्यभर वाढतो, इतका लांब होतो की म्हातारपणात लटकू लागतो
एका डॉक्टरांनी मुलांना अशापद्धतीने खांद्यावर, डोक्यावर घेतल्याने त्याचे काय परिणाम होतात हे व्हिडीओसह दाखवलं आहे. डॉक्टरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक व्यक्ती अशाच पद्धतीने एका मुलाला घेते आणि नाचू लागते. काही वेळाने मुलाचा तोल जातो जो त्या व्यक्तीलाही सावरत नाही आणि मुलगा धाडकन खाली जमिनीवर कोसळतो. दृश्य पाहूनच आपल्याला धडकी भरते.
ज्या डॉक्टरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे त्यांचं नाव संतोष यादव असं आहे. ते बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी या व्हिडीओत सांगितलं की, अशा पद्धतीने मुलं पडण्याचा आणि डोक्याला मार लागण्याचा धोका आहे. पाय किंवा हाताला फ्रॅक्चर होऊ शकतो. मुलांच्या मानेचे मसल्स कमजोर असतात त्यामुळे त्यांच्या स्पाइनला दुखापत होऊ शकते. श्वास आणि मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. भीती आणि इमोशनल स्ट्रेस निर्माण होई शकतो. मुलांच्या डोक्यावाला, मानेला आणि शरीराला सपोर्ट द्या.
@parentingtips_surat या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तसंच ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेणेकरून असा धोका टाळता येईल.