मुलगी जिला धनाची पेटी, लक्ष्मी आणि आता पापा की परीही म्हटलं जातं. अशीच एक मुलगी आपल्या वडिलांसाठी लक्ष्मी म्हणा किंवा पापा की परी म्हणा, ती प्रत्यक्षात ठरली. आपल्या वडिलांना तिनं बर्थ डे गिफ्ट काय दिलं त्यांचं नशीबच फळफळलं. क्षणात तिचे वडील लखपती झाले.
अजब प्रकरण! तिकडे मुलगा पैसे कमवायला घराबाहेर गेला, इकडे सासूने सुनेचं बॉयफ्रेंडसोबत लावलं लग्न
advertisement
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना इथं राहणारे 81 वर्षांचे डेनिस पार्क्सची. ज्यांनी लॉटरी जिंकली आणि जेव्हा ते क्लेम करायला गेले तेव्हा त्यांना आणखी एक मोठं सरप्राईझ मिळालं. त्यांच्या मुलीने त्यांना बर्थ डे गिफ्ट म्हणून आणखी एक लॉटरीचं तिकीट दिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल डेनिस यांनी दुसरं लॉटरी तिकीटही जिंकलं.
जेव्हा डेनिस यांनी दोन्ही तिकिटं स्क्रॅच केली तेव्हा एकूण बक्षीस 80 लाख रुपयांवर पोहोचलं. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर डेनिस यांचा आनंद गगनात मावेना. आपला आनंद व्यक्त करताना पार्क्स म्हणाले की, त्यांच्या आयुष्यात यापेक्षा संस्मरणीय दिवस असूच शकत नाही.
Shocking! वडिलांच्या शवपेटीसोबत कबरीत गेलं संपूर्ण कुटुंब, अंत्यसंस्कारावेळी भयंकर घडलं
आता या पैशांचं काय करणार असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, बक्षीसाच्या मदतीने ते त्यांचं उर्वरित बिल भरतील आणि संपूर्ण कुटुंबासह ओहायोला पिकनिकला जातील. पार्क्सने हा विजय केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा असल्याचं म्हटलं.
एका वृद्ध माणसाने त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मोठी लॉटरी जिंकली. अशा घटनांचा लोकांवर इतका परिणाम होतो की त्या सोशल मीडियावर लवकर व्हायरल होतात.