एक नवरी जिच्या लहान भावाचा मृत्यू झाला होता पण बहिणीच्या लग्नाला मात्र मृत भाऊ आवर्जून आला. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे, यावर विश्वासच बसत नसेल. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.
आश्चर्यम! डोकं कापलं तरी 18 महिने कोंबडा जिवंत, पण कसा काय?
लग्नात सगळे जण आनंदी आहेत. वधू आणि वर देखील खूप आनंदी दिसत आहेत. अचानक संपूर्ण कुटुंब एका मोठ्या पडद्यासमोर जमतं आणि लग्नाची फिल्म सुरू होते. या फिल्ममध्ये चक्क वधूचा मृत भाऊ दिसतो. तो एक-एक करून सर्वांसोबत फोटो काढतो आणि आपल्या बहिणीलाही भेटतो. फ्रेममध्ये हा एक असा सीन होता ज्याने सर्वांना हादरवून टाकलं. सगळ्यांनाच रडू कोसळलं.
advertisement
हा क्षण पाहून लग्नात आलेली प्रत्येक व्यक्ती रडलीच पण व्हिडीओ पाहणाऱ्यालाही अश्रू आवरता आले नाही. असा भावनिक क्षण त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नसल्याची प्रतिक्रिया देत आहेत.
महिला जास्त काळ का जगतात? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा Video
हा इमोशनल व्हिडिओ pawan_comedian_tijara नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आता हे कसं शक्य झालं? तर एआयमुळे. एआयच्या मदतीनेही, वधूच्या कुटुंबाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं.