कोल्हापूर : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचं कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. अगदी युट्युबच्या जगातही महाडिक कुटुंबाचा चांगलाच वावर आहे. धनंजय यांना 3 मुलं असून त्यातील विश्वराज आणि पृथ्वीराज यांचा विवाह झाला आहे. तर कृष्णराज यांचा विवाह बाकी आहे. यंदा कृष्णराजच्या लग्नाचा बार उडवायचा असल्याचं धनंजय यांनी एका व्हिडिओत म्हटलं होतं. अशातच कृष्णराज यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबत अंबाबाई मंदिरात दर्शन घेतलं. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज युट्यूबर, समाजसेवक आणि उद्योजक आहे. त्याच्या युट्यूब व्हिडीओमध्ये तो त्याच्या कुटुंबातील अनेक गमतीजमती शेअर करत असतो. दरम्यान कृष्णराज आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा एक फोटो आला आणि त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. अकलूजची लेक कोल्हापूरची सून होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण रिंकू आणि कृष्णाचा फोटो व्हायरल होण्याआधीचा महाडिकांचाच एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
BMW ची दुर्मिळ R25! भारतात फक्त दोन गाड्या, त्यापैकी एक कोल्हापूरकराची..!
दोन आठवड्यांपूर्वीच कृष्णराजने युट्यूबवर कुटुंबासोबत ‘हॅप्पी न्यू इअर’चा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात महाडिक कुटुंबियांनी त्यांचे न्यू इअर रिझ्युलेशन शेअर केलं होतं. या व्हिडीओमध्ये कृष्णराजने वडील धनंजय महाडिक यांना त्यांच्या न्यू इअर रेझ्युलेशनबद्दल विचारलं. तेव्हा धनंजय महाडिक यांनी नवीन वर्षाचं रेझ्युलेशन असं आहे की, “मला खूप पुस्तकं वाचायची आहेत. नियमित व्यायाम करायचा आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि आपल्या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, असं म्हटलं होतं.
कृष्णाचं लग्न करायचंय!
धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना, “मला यावर्षी कृष्णाचं लग्न करायचं आहे. पहिल्या दोन सुना आहेत तशीच तिसरी सून पाहिजे. युझर्समध्ये कोणी असेल तर अरुंधती महाडिकांना बायोडेटा सेंड करा आणि चांगलं स्थळ सूचवा, असं म्हटलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांत कृष्णराज आणि रिंकू यांनी अंबाबाई मंदिरात एकत्र दर्शन घेतल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली. मात्र, याबाबत कृष्णराजचे माध्यमांशी बोलताना आपल्यात मैत्रीचं नातं असल्याचं सांगितलं आहे.





