चीनमधील रेणुई जियुडू मॅटर्निटी हॉस्पिटलमधून एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार इथं सर्जन म्हणून काम करणारा डॉक्टर महिलांच्या शरीरातील अवयव चोरायचा. तो महिलांना डिलीव्हरी करण्यात मदत करायचा. या काळात तो बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या शरीरातून बाहेर पडणारी प्लेसेंटा चोरायचा आणि कचऱ्याच्या पिशवीत लपवायचा. जेव्हा तो सीसीटीव्हीमध्ये हे करताना दिसला तेव्हा कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
advertisement
OMG! बाळाच्या पोटात बाळ, अवघ्या 2 महिन्यांचं मूल प्रेग्नंट, पण कसं काय?
प्लेसेंटा हा प्रत्यक्षात गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात तयार होणारा अवयव आहे. यातूनच बाळाला पोषण मिळते आणि प्रसूतीनंतर ते बाहेर फेकलं जातं. चिनी औषधांमध्ये याचा वापर केला जात असे कारण जुन्या चिनी परंपरेनुसार हे अत्यंत पौष्टिक आहे आणि ते खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
2005 पासून चीनमध्ये प्लेसेंटा विक्रीवर बंदी आहे. ते फक्त मुलाला जन्म देणाऱ्या महिलेलाच दिलं जाऊ शकतं. तरी आजही ते काळ्या बाजारात सुमारे 30 हजार रुपये प्रति किलोने विकलं जातं आणि हा डॉक्टरदेखील असंच काहीतरी करत होता.