OMG! बाळाच्या पोटात बाळ, अवघ्या 2 महिन्यांचं मूल प्रेग्नंट, पण कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baby pregnant : हे प्रकरण मेडिकल जर्नलमध्येही प्रसिद्ध झालं आहे. आतापर्यंत जगात अशी दोनशेपेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
नवी दिल्ली : अवघ्या 2 महिन्यांचं बाळ प्रेग्नंट झालं वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असं घडलं आहे. एका 2 महिन्यांच्या बाळाच्या पोटात चक्क दुसरं बाळ होतं. 2 महिन्यांच्या या प्रेग्नंट बाळाने वैद्यकीय जगात खळबळ उडवून दिली. हे प्रकरण जगभर चर्चेत आलं आहे.
मुलाचं पोट सुजलेलं होतं. पालकांनी त्याला डॉक्टरकडे नेलं. तिथं डॉक्टरांना पहिलं वाटलं की ही किडनीची समस्या आहे. विल्म्स ट्यूमर आहे. हे मूत्रपिंडातील समस्येमुळे होतं. आणि त्यांनी उपचार सुरू केले.
पण सीटी स्कॅन केल्यानंतर पोट फुगण्यामागील खरं कारण समोर आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. डॉक्टरांना त्याच्या पोटात मऊ ऊती असल्याचं दिसून आलं. त्यात चरबी असते, तसंच हाडेही असतात. या आकृतीत त्यांना मानवी बाळासारखा पाठीचा कणा दिसला. मग त्यांना कळलं ही या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ आहे.
advertisement
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गर्भाशयात वाढणारं बाळ अर्धवट विकसित होतं. त्याच्या पाठीचा कणा आणि चेहऱ्याची हाडं तयार झाली होती. डॉक्टरांना आढळले की अम्नीओटिक सॅकमध्ये एक अर्ध-विकसित बाळ होतं. त्याच्या डोक्यावर केस होते आणि त्याचा पाठीचा कणाही चांगला तयार झाला होता. हातांना बोटं आणि पायांना अंगठेही होते.
advertisement
वैद्यकीय भाषेत याला फिटस इन फेटू म्हणतात. आतापर्यंत जगभरातून असे दोनशेपेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, त्या महिलेच्या पोटात जुळी मुलं होती. पण त्यापैकी एक दुसऱ्याच्या पोटात गेला. आईने एका मुलाला जन्म दिला पण त्याच बाळासोबत पोटातून दुसरं बाळ बाहेर आलं.
advertisement
अफगाणिस्तानातील काबूलमधील ही घटना. बाळाला भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलाची शस्त्रक्रिया काबूलमध्ये झाली. आता तो मुलगा व्यवस्थित आहे. हे प्रकरण मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.
Location :
Delhi
First Published :
April 03, 2025 12:20 PM IST