सियाचीन व्हेटरनरी कॉर्प्स (आरव्हीसी) या सैन्याच्या विभागात बॅक्ट्रियन उंटांची संख्या वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकूण 14 बॅक्ट्रियन उंट आहेत. हे उंट चाचणी म्हणून वापरले गेले आणि त्याचा अनुभव खूपच यशस्वी ठरला आहे. हे उंट हिमाच्छादित भागांमध्ये गस्ती करताना कोणत्याही मशिनरीपेक्षा जास्त उपयुक्त ठरले आहेत.
advertisement
मुंग्या रस्ता ओलांडत आहेत थांबा! तरुणाने मुंग्यांसाठी सगळ्यांना थांबवलं, पुढे काय घडलं Watch Video
हे उंट गस्तीच्या वेळेस दोन सैनिकांना वाहून नेऊ शकतात, त्यासाठी डीआरडीओच्या उच्च उंची संशोधन प्रयोगशाळेने एक खास प्रकारचं 'पॅक' बनवलं आहे, जे या दोन कूबडाच्या उंटांवर फिट होतं.
बॅक्ट्रियन उंटांचं वैशिष्ट्य
बॅक्ट्रियन उंट सामान्य उंटांपेक्षा लहान पण जड असतो. याच्या पाठीवर दोन कूबड असतात आणि त्यामध्ये साठवलेली चरबी त्याला अनेक दिवस अन्नाशिवाय राहण्याची ताकद देते. हा उंट -40 डिग्री तापमानातही सहज राहू शकतो. हे उंट तब्बल 150 ते 200 किलो वजन सहज वाहून नेतात. त्यामुळे हिमाच्छादित भागांमध्ये, विशेषतः 14 हजार फूट उंचीवर गस्ती करणं जास्त सोयीचं ठरणार आहे.
सेंट्रल एशिया जसं की अफगानिस्तान आणि चीनमध्ये आढळणारे ब्रॅक्ट्रियन उंटामध्ये एका एवजी दोन हम्प किंवा कुबड दिसतात. लडाखमधल्या नुब्रा व्हॅलीत काहीच गावांमध्ये हे उंट सध्या पाळले जातात. नुब्रा घाटीतील फक्त एक-दोन गावात ते उंट आहेत. सध्या तिथं फक्त 300 ते 350 उंट असण्याची शक्यता आहे.
General Knowledge : बैल आणि वळूमध्ये फरक काय? दोघांमध्ये काय वेगळं असतं?
उंट आपल्या कुबडामध्ये फॅट जमा करतो. या फॅटचा वापर उंट काही दिवसांसाठी करु शकतो. जेव्हा उंटाला अनेक दिवस वाळवंटात जेवण मिळत नाही, त्यावेळी ते कुबडामधील फॅट्सचा वापर करतात. जेव्हा उंट कुबडातील फॅट्सचा उपयोग करतो, तेव्हा हे कुबड खाली पडतं. लायब्रेरी ऑफ कँग्रेसनुसार जेवण आणि अराम केल्याने उंटाचं हे कुबड खूपच सामान्य होतं. उंट एकावेळी अनेक लीटर पाणी पितो आणि त्या पाण्याला आपल्या ब्लडस्ट्रीममध्ये जमा करून ठेवतो.