मुंग्या रस्ता ओलांडत आहेत थांबा! तरुणाने मुंग्यांसाठी सगळ्यांना थांबवलं, पुढे काय घडलं Watch Video

Last Updated:

Viral Video : मुंग्या रस्ता ओलांडत आहे सांगणाऱ्या तरुणाच्या बोलण्याने काही लोक गोंधळलेले. पण एका व्यक्तीने मने जिंकली. शेवटच्या व्यक्तीने जे म्हटलं ते कौतुकास्पद आहे.

News18
News18
नवी दिल्ली : गाडी चालवत असताना समोरून कुणी रस्ता ओलांडत असेल तर गाडी थांबवली जाते. आपण चालत असू तर आपण किंचित थांबतो. मग समोरून रस्त्या क्रॉस करणारा माणूस असो वा प्राणी. पण मुंगी जी चालतानाही पटकन दिसत नाही, तिच्यासाठी चक्क लोक थांबलं. ही घटना मुंबईतील आहे. जिथं मुंग्यांसाठी ट्रॅफिक कंट्रोल करण्यात आलं.
आर्यन कटारिया नावाचा मुलगा ज्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडओ पोस्ट केला आहे. मुंग्या वाचवा, मुंग्या वाढवा अशी मोहीम आर्यनने सुरू केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आर्यनने लोकांना मुंग्या रस्ता ओलांडेपर्यंत जाऊ नका असं सांगितलं आहे.
advertisement
आर्यनने निऑन जॅकेट घातलं  आहे आणि खऱ्या अधिकाऱ्यासारखा दिसण्यासाठी त्याने हातात शिट्टी धरली होती. तो एका वर्दळीच्या रस्त्यावर उभा राहून लोकांना सांगतो की मुंग्या रस्ता ओलांडत आहे त्यांना थांबावं लागेल. कारण ते 'एक मुंगी वाचवा, एक मुंगी वाढवा', या सरकारच्या नवीन योजनेचा भाग आहे,  नियमांचं पालन न करणाऱ्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी दिली जाते.
advertisement
आर्यनच्या बोलण्याने काही लोक गोंधळलेले. पण एका व्यक्तीने मने जिंकली. शेवटच्या व्यक्तीने जे म्हटलं ते कौतुकास्पद आहे. त्याने म्हटलं की मुंग्या देखील जिवंत प्राणी आहेत आणि त्यांचं जीवन देखील महत्त्वाचं आहे. त्याचं संवेदनशील उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि युझर्सनी त्याचं कौतुक केलं.



 










View this post on Instagram























 

A post shared by Aryan Kataria (@katariaaryann)



advertisement
@katariaaryann इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक कमेंट आल्या आहेत. एका युझरने लिहिलं, "मला शेवटचा माणूस खूप आवडला, तो अगदी माझ्यासारखाच आहे." दुसऱ्याने लिहिलं, "शेवटचा माणूस जैन आहे."
एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, "जैन वसाहतींमध्ये मुंग्यांसाठी पांढऱ्या पट्ट्या असतात." दुसऱ्या युझरने म्हटलं, "इंटरनेटवरची सर्वात चांगली गोष्ट पाहिली." कोणीतरी विनोदाने लिहिले, "मुंग्या देखील JVLR ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत, इतकी वाईट परिस्थिती!" आर्यन कटारिया यापूर्वीही त्याच्या अनोख्या कंटेंटसह व्हायरल झाला आहे.
advertisement
एकंदर पाहिला तर मुंग्यांसाठी ट्रॅफिक थांबवावं किंवा लोकांनी थांबावं असा कोणता नियम नाही. पण तरुणाने हे व्हायरल होण्यासाठी केलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
मुंग्या रस्ता ओलांडत आहेत थांबा! तरुणाने मुंग्यांसाठी सगळ्यांना थांबवलं, पुढे काय घडलं Watch Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement