एक अज्ञात वस्तू अवकाशात पृथ्वीकडे खूप वेगाने जात आहे. या परग्रही वस्तूबद्दल शास्त्रज्ञ अनेक प्रकारे अंदाज लावत आहेत. त्याला 3 I/ अॅटलस असं नाव देण्यात आलं आहे. काही शास्त्रज्ञ त्याला धूमकेतू मानत आहेत, तर काही जण त्याला सामान्य खगोलीय पिंड मानत आहेत. हार्वर्डचे प्राध्यापक अवी लोएब या रहस्यमय वस्तूवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की ते एक एलियन अंतराळयान असू शकतं.जे आपल्याला वाचवू शकते किंवा आपला नाश करू शकतं.
advertisement
पृथ्वीच्या आत धकधक! दर 26 सेकंदांनी होतेय हृदयासारखी धडधड, आवाजाचं रहस्य काय?
प्राध्यापक लोएब यांचा असा विश्वास आहे की ते काही तांत्रिक डिझाइनचे परिणाम असू शकतं. त्यांनी या वस्तूची तुलना आर्थर सी क्लार्क यांच्या 'रेंडेझव्हस विथ रामा' या कादंबरीशी केली आहे, ज्यामध्ये एक रहस्यमय परग्रही वस्तू एक परग्रही अंतराळयान असल्याचं दिसून आलं आहे. ही अज्ञात वस्तू 1 जुलै रोजी सापडली आणि लोएब यांनी इशारा दिला आहे की जर ते परग्रही जहाज असेल तर ते प्रोब किंवा शस्त्र देखील घेऊन येऊ शकतं.
त्यांनी भाकीत केले आहे की हे यान 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान पृथ्वीवर पोहोचू शकते. गेल्या वेळी दिसलेल्या 100 मीटर लांबीच्या एलियन ऑब्जेक्टपेक्षा हा सुमारे 200 पट मोठा आहे. प्रोफेसर लोएब म्हणतात की इतक्या मोठ्या ऑब्जेक्टचे दिसणं तज्ज्ञाना गोंधळात टाकण्यास पुरेसं आहे.
बापरे! हे कोणतं संकट? निळेशार महासागर होताहेत काळे, रहस्य काय? वैज्ञानिकही चिंतेत
ते म्हणाले, "राहण्यायोग्य ग्रहांवर प्रोब तैनात करण्याच्या परिस्थिती अशा कोणत्याही वाहनासाठी परिपूर्ण आहेत. ते आपल्याला वाचवू शकते किंवा नष्ट करू शकते. आपण दोन्ही शक्यतांसाठी तयार असले पाहिजे आणि सर्व बाह्य वस्तू फक्त खडक आहेत याची खात्री केली पाहिजे.
नासानेही या रहस्यमय वस्तूचे अस्तित्व मान्य केलं
नासाच्या मते, ही वस्तू ताशी 1,35,000 मैल वेगाने आतील सौर मंडळाकडे जात आहे. नासाने म्हटलं आहे की ही वस्तू 30 ऑक्टोबरच्या रात्री सूर्याच्या सर्वात जवळ असेल, परंतु आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ती अजूनही 130 दशलक्ष मैल दूर आहे. पण त्याच्या अंतरामुळे शास्त्रज्ञ त्याचा अचूक आकार मोजू शकत नाहीत, परंतु असा अंदाज आहे की तो सुमारे 20-40 किमी आहे.
इतर शास्त्रज्ञ काय म्हणतात?
पण सर्व शास्त्रज्ञ त्यांच्याशी सहमत नाहीत. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ ख्रिस लिंटॉट यांनी त्यांच्या दाव्यांचे वर्णन पूर्णपणे मूर्खपणा असं केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की एलियन प्रोबचा सिद्धांत हा ऑब्जेक्ट समजून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या रोमांचक कामाचा अपमान आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने या ऑब्जेक्टला एलियन धूमकेतू म्हटलं आहे.
लोएब यांनीदेखील कबूल केलं की हा धूमकेतू असू शकतो. पण तरीही अधिक संशोधनाला वाव आहे, कारण तो अंतराळयान असण्याची थोडीशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कायम आहे की तो फक्त एक महाकाय धूमकेतू आहे की तो विश्वाच्या इतर संस्कृतीने पाठवलेला संदेश आहे? शास्त्रज्ञ त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.