खगोल भौतिक शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात आढळून आलं आहे की गेल्या पाच वर्षांपासून पृथ्वीचा परिवलन वेग वाढत आहे. काही अज्ञात कारणास्त 2020 पासून पृथ्वी तिच्या अक्षाभोवती नेहमीपेक्षा जास्त वेगाने फिरत आहे. चंद्राच्या कक्षाच्या पृथ्वीवरील परिणामामुळे हे घडेल असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
बापरे! हे कोणतं संकट? निळेशार महासागर होताहेत काळे, रहस्य काय? वैज्ञानिकही चिंतेत
advertisement
यामुळे आपण इतिहासातील सर्वात लहान दिवस अनुभवू शकतो. म्हणजेच हा दिवस 24 तासांपेक्षा कमी असेल. हा सर्वात लहान दिवस या महिन्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये पाहता येईल. खगोलभौतिकशास्त्रज्ञ ग्राहम जोन्स यांनी सर्वात लहान दिवसासाठी तीन तारखा सुचवल्या आहेत . या वर्षी 9 जुलै किंवा 22 जुलै किंवा पुढील महिन्यात 5 ऑगस्ट ही तारीख असू शकते. हा दिवस सामान्य दिवसापेक्षा 1.66 मिलिसेकंदांपेक्षा जास्त लहान असेल.
दिवस लहान का होत आहेत?
एक सौर दिवस अगदी 86,400 सेकंद किंवा 24 तासांचा असावा. पण पृथ्वीचं परिभ्रमण कधीच पूर्णपणे स्थिर राहिलं नाही. 2020 मध्ये आपला ग्रह वेगाने फिरू लागला. यामुळे दिवसाचा कालावधी कमी झाला आहे.
2021 मध्ये एक दिवस नोंदवला गेला जो सामान्यपेक्षा 1.47 मिलिसेकंद कमी होता. 2022 मध्ये तो 1.59 मिलिसेकंद कमी झाला आणि त्यानंतर 5 जुलै 2024 रोजी एक विक्रम करण्यात आला, जेव्हा दिवस सामान्य 24 तासांपेक्षा 1.66 मिलिसेकंद कमी होता.
पृथ्वीच्या आत धकधक! दर 26 सेकंदांनी होतेय हृदयासारखी धडधड, आवाजाचं रहस्य काय?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 2025 मध्ये, 9 जुलै आणि 22 किंवा 5 ऑगस्ट या तारखा अंदाजे चंद्राची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात दूर असेल. याचा पृथ्वीवर परिणाम होईल आणि दिवस २४ तासांपेक्षा कमी होईल.
त्या दिवसाची घटना किती चिंताजनक?
दिवस काही मिलिसेकंद कमी केल्याने सामान्य जीवनात काही फरक पडणार नाही पण तंत्रज्ञान आणि दूरसंचार जगात ते महत्त्वाचं आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर हीच प्रवृत्ती चालू राहिली तर सुमारे 50 अब्ज वर्षांत पृथ्वीचं परिवलन चंद्राच्या कक्षेशी सुसंगत होईल. त्यानंतर चंद्राची फक्त एकच बाजू नेहमीच दृश्यमान असेल म्हणजेच ती ग्रहाच्या फक्त अर्ध्या भागातच दृश्यमान असेल. तथापि, तोपर्यंत पृथ्वीवर बरेच बदल झालेले असतील.