राघवन हे कासारगोड शहरातील एका कपड्याच्या दुकानात टेलर म्हणून काम करत होते. बुधवारी सकाळी ते कामावर जात असताना त्यांना रस्त्यात एक पिकलेला आंबा सापडला. तो आंबा खात असताना, त्याची साल त्यांच्या घशात अडकली आणि ते तिथेच कोसळले.
जवळपासच्या लोकांनी तात्काळ राघवन यांना कासारगोड शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांना त्यांना वाचवता आले नाही. राघवन यांच्या निधनाने कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी निर्मला, मुले गणेश, अविनाश, अनिता, सरिता आणि सुना सौम्या, मनोज, अजित असा परिवार आहे.
advertisement
हे ही वाचा : जगातील 'हे' 3 साप आहेत सर्वात खतरनाक! 30 मिनिटांत उपचार मिळाला नाही, तर समजा, 'राम नाम सत्य है'
हे ही वाचा : बाप रे! पोटात हे काय सापडलं? 'ही' महिला खात होती स्वतःचेच केस; जेव्हा त्रास असह्य झाला...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 11:43 AM IST