एका व्यक्तीने त्याच्या सहकाऱ्याबाबतची धक्कादायक घटना सोशल मीडियावर सांगितली आहे. एक्स अकाऊंटवर त्याने पोस्ट केली आहे. या व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या कर्मचाऱ्याने त्याला सुट्टीसाठी मेसेज केला. त्याने ती मंजूर केली आणि तो त्याच्या घरी गेला. त्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला.
मोबाईलमध्ये 'डोकं', तरुणीची भयानक अवस्था, प्रत्येकाने हे पाहायलाच हवं
advertisement
के. व्ही. अय्यर नावाची ही व्यक्ती. जिने @BanCheneProduct एक्स अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव शंकर आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे. शंकरने सकाळी 8:37 वाजता रजा मागण्यासाठी मेसेज पाठवला. मेसेजमध्ये म्हटलं होतं की त्याला पाठदुखीचा त्रास होत आहे, म्हणून त्याला रजा हवी आहे. अय्यर यांनीही सामान्यपणे उत्तर दिलं, "ठीक आहे, आराम करा.
पुढे त्यांनी सांगितलं की, "तो दिवसही सामान्य दिवसासारखा होता, पण काही मिनिटांत सर्व काही बदललं. मला सकाळी 11 वाजता एक फोन आला, जो माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक फोन होता. शंकरचा मृत्यू झाल्याचं फोनवर सांगण्यात आलं. सुरुवातीला मला विश्वास बसला नाही. मी माझ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला कन्फर्म करायला सांगितलं. शंकरच्या घराचा पत्ता शोधला आणि त्याच्या घरी गेलो. तेव्हा खात्री पटली की त्यांना मिळालेली माहिती खरी आहे, शंकर आता या जगात नाही."
जयमती गेली कुठे? रस्त्यावरून चालताना हत्ती अचानक गायब, किंमत 1 कोटी
के.व्ही. अय्यर म्हणाले की, "शंकर माझ्या मध्ये 6 वर्षांपासून होता. तो 40 वर्षांचा होता. हेल्दी आणि फीट. त्याचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगाही आहे. त्याने कधीच सिगारेट, दारूला स्पर्शही केला नाही. त्याला कार्डियाक अरेस्ट आला. धक्कादायक म्हणजे त्याने सकाळी 8.37 ला मला मेसेज केला आणि सकाळी 8.47 ला त्याने शेवटचा श्वास घेतला. मृत्यूच्या 10 मिनिट आधी त्याने शुद्धीवर असताना मला मेसेज केला. मी पूर्णपणे धक्क्यात होतो."
"आयुष्याचं काही सांगू शकत नाही. तुमच्या आजूबाजूला असलेल्या माणसांसोबत शेवटच्या क्षणापर्यंत चांगले आणि आनंदी राहा. पुढच्या क्षणी काय होणार आहे तुम्हाला माहिती नाही.", असं अय्यर म्हणाले.
