दिल्लीत हा प्रकार घडला आहे. दिल्ली गेलेली एक व्यक्ती जिला महाराष्ट्राबाबत प्रश्न विचारण्यात आले. या व्यक्तीला दिल्ली महाराष्ट्राबाबत 5 प्रश्न विचारले गेले. एकाही प्रश्नाचं उत्तर या व्यक्तीला आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. आता तुम्ही म्हणाल हा नेमका गुन्हा काय आहे? तर ही घटना आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील.
advertisement
Taj Mahal : ताजमहालच्या ज्या भागात जायला बंदी तिथंच गेली व्यक्ती, दिसलं असं दृश्य की...
आंतरराष्ट्रीय विमानाने जाणाऱ्या एका प्रवाशाला दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल एअरपोर्टवर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राबाबत काही प्रश्न विचारले. कारण त्याच्या पासपोर्टवर महाराष्ट्राचं नाव लिहिलं होतं. हा प्रवासी काम एअरच्या विमान RQ-4402 ने काबूलला जायला निघाला होता. त्याचं सामान तपासल्यानंतर तो कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन काउंटरवर गेला, जिथं त्याची परीक्षा सुरू झाली.
एका वरिष्ठ विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्टवरून प्रवाशाची ओळख मोहम्मद रसूल नजीब खान अशी झाली आहे, ज्यावर नवी मुंबई, महाराष्ट्र आणि मुंबई हे त्याचं जन्मस्थान असल्याचा पत्ता लिहिलेला आहे.
मुलाचं लग्न, कौतुकाने सुनेला पाहत होती, नवरीच्या हातावर नजर पडली अन् सासू किंचाळूच लागली
माणूस बोलताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत मुंबईचा प्रभाव किंवा मराठीचा कोणताही लवलेश दिसत नव्हता. ज्यामुळे त्याच्या ओळखीबद्दल शंका निर्माण झाली. पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्याने त्याला महाराष्ट्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले, पण प्रवाशाला एकाचंही उत्तर देता आलं नाही. काहीतरी गडबड आहे याची खात्री पटल्याने इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान तो माणूस महाराष्ट्राचा नसून अफगाणिस्तानचा असल्याचं उघड झालं. त्याने मुंबईच्या पत्त्याचा वापर करून बेकायदेशीरपणे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. या शोधानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला पुढील चौकशीसाठी आयजीआय विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.