मुलाचं लग्न, कौतुकाने सुनेला पाहत होती, नवरीच्या हातावर नजर पडली अन् सासू किंचाळूच लागली

Last Updated:

Mother in law Daughter in Law : आपल्या मुलाच्या लग्नाचं असंच स्वप्न पाहणारी एक महिला जिचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत होतं. पण याच लग्नाच तिला मोठा धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो (AI Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Image)
नवी दिल्ली : मुलांचं शिक्षण, करिअर यानंतर पालकांना काळजी असते ती त्यांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं लग्न थाटामाटात व्हावं, असं स्वप्न कित्येक पालकांचं असतं. यासाठी काही पालक तर त्याच्या लहानपणापासूनही त्याच्या लग्नाची तयारी करतात म्हणजे बचत करायला सुरुवात करतात. आपल्या मुलाला योग्य जोडीदारा मिळावा अशी अपेक्षा त्यांची असते. आपल्या मुलाच्या लग्नाचं असंच स्वप्न पाहणारी एक महिला जिचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत होतं. पण याच लग्नाच तिला मोठा धक्का बसला.
चीनच्या सुझोऊ शहरातील ही घटना आहे. महिलेच्या मुलाचं लग्न सुरू होतं. अगदी थाटात लग्नसोहळा सुरू होता. सासू आपल्या सुनेला कौतुकाने पाहत होती. इतक्यात तिची नजर नवरीच्या हातावर पडली आणि तिला धक्काच बसला, वधूचा हात पाहून ती मोठ्याने ओरडली. आता असं या वधूच्या हातावर काय होतं की सासू ओरडली, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
सासूला वधूच्या हातावर एक खूण दिसली, जी तिची जन्मखूण होती. सुनेच्या हातावरील ही जन्मखूण अगदी सासूच्या मुलीच्या हातावर असलेल्या जन्मखूणेसारखीच होती. जी मुलगी कित्येक वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. जी आपली सून झाली आहे ती आपलीच बेपत्ता झालेली मुलगी आहे असं तिला वाटत होतं. म्हणून तिने तिच्या पालकांना ती त्यांची बायोलॉजिकल मुलगी आहे की नाही असं विचारलं. यावर वधूच्या पालकांनी त्यांना ती लहान असताना रस्त्याच्या कडेला सापडल्याचं सांगितलं. त्यांनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केल्याचं ते म्हणाले.
advertisement
सत्य समजताच वराची आई रडू लागली आणि वधूला मिठी मारली. ही आपली मुलगी आहे, जी कित्येक वर्षांपूर्वी हरवली होती, असं तिनं सांगितलं. आपल्या खऱ्या आईला भेटल्यानंतर वधूदेखील भावुक झाली आणि रडू लागली. आपणही कित्येक वर्षे आपल्या खऱ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं ती म्हणाली. या धक्कादायक खुलाशानंतर लग्नाचं वातावरण भावनिक कौटुंबिक पुनर्मिलनात बदललं. आई आणि मुलीचं एकमेकांना मिठी मारतानाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
आता सगळ्यात मोठा प्रश्न... सून मुलगी निघाली मग मुलाचं काय झालं, त्यांच्या लग्नाचं काय? कारण तसं नात्याने दोघंही भाऊबहीण, मग? तर साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ओरिएंटल डेलीच्या एका वृत्ताचा हवाला देत म्हटलं आहे की, तो मुलगाही त्या महिलेचा बायोलॉजिकल मुलगा नव्हता. तर तिने तिची मुलगी हरवल्यानंतर ते दुःख कमी करण्यासाठी एका मुलाला दत्तक घेतलं होतं, जो तोच वर आहे. म्हणजेच वधू आणि वराचे एकमेकांशी रक्ताचं नातं नव्हतं. यामुळे लग्नात कोणताही अडथळा नव्हता. त्यांचं लग्न झालं.
advertisement
हा दिवस कुटुंबासाठी आयुष्यभराचा संस्मरणीय क्षण बनला. ही घटना 2021 मधील एका लग्नातील आहे. पण ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या/Viral/
मुलाचं लग्न, कौतुकाने सुनेला पाहत होती, नवरीच्या हातावर नजर पडली अन् सासू किंचाळूच लागली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement