TRENDING:

FASTag विसरा! 'या' देशाची टोल सिस्टम जगात सर्वात Fast, काही देशांचे नियम तर तुम्हाला चक्रावून सोडतील

Last Updated:

कोणी वर्षाला भरतं, तर कुणी टोलच भरत नाही; जगातील काही असे देश ज्यांची टोल सिस्टम तुम्हाला चक्रावून सोडेल

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतातील खासगी वाहनचालकांसाठी केंद्र सरकार एक नवा नियम लागू करणार आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून खासगी वापरासाठी असलेल्या वाहनांसाठी फास्टॅगवर आधारित वार्षिक पास मिळणार आहे. या पासची किंमत 3 हजार रुपये असेल आणि त्याच्या मदतीने वाहनचालक वर्षभरात 200 वेळा टोल प्लाझावरून सहज आणि जलद प्रवास करू शकतील. यामुळे वेळेची आणि पैशांची दोन्ही बचत होणार आहे. यामुळे नागरीक देखील खूश आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल. मात्र हे पास केवळ ‘गैर-व्यावसायिक’ वाहनांसाठीच लागू असतील. त्यामुळे व्यावसायिक वाहानांना मात्र दरा प्रमाणे पैसे द्यावी लागतील जे फास्टॅगमधून कापले जातील.

जगातील सर्वात जलद टोल सिस्टीम कुठे आहे?

भारताचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी जगात आधीच काही देशांनी प्रगत आणि अत्याधुनिक टोल प्रणाली लागू केल्या आहेत. त्यात नॉर्वेचा टोल सिस्टीम जगातला सर्वात वेगवान आणि टेक्नोलॉजी फ्रेंडली मानला जातो.

advertisement

नॉर्वेमध्ये टोल भरताना वाहन थांबवण्याची गरजच नाही. कारण इथे टोल नाके नाहीत! टोल वसुलीची जबाबदारी कॅमेऱ्यांची आहे. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. गाडी कितीही वेगात असली तरी कॅमेरा नंबर प्लेट ओळखतो आणि संबंधित अकाउंटमधून थेट टोल रक्कम वजा होते.

नॉर्वेने 1991 मध्ये या स्मार्ट टोल सिस्टीमची सुरुवात केली होती. त्यानंतर सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान अशा अनेक देशांनी यापासून प्रेरणा घेतली. काही देशांनी वार्षिक टोल सिस्टीम सुरू केली. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडमध्ये वर्षातून एकदाच टोल फी भरली जाते आणि वर्षभर कुठेही थांबायची गरज लागत नाही.

advertisement

भारत सरकारच्या या नव्या योजनेमुळे आता टोलसाठी अनेकदा थांबावे लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की, 3 हजार रुपयांच्या वार्षिक फास्टॅग पासमुळे लोकांना सुमारे 10 हजार रुपयांपर्यंतचा टोल वाचेल. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असून वाहनचालकांसाठी हा निर्णय क्रांतिकारी ठरेल.

मराठी बातम्या/Viral/
FASTag विसरा! 'या' देशाची टोल सिस्टम जगात सर्वात Fast, काही देशांचे नियम तर तुम्हाला चक्रावून सोडतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल