सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की - एका व्यक्तीने दरवाजाजवळ अजगर पकडला आहे. हा अजगर खूप मोठा आहे. त्या व्यक्तीने या अजगराचं तोंड आपल्या हातात धरलं आहे. यादरम्यान तिथे काही लोकांची गर्दीही दिसून येते. त्या व्यक्तीने अजगराचं तोंड धरताच साप सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अजगर त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ लागतो. अजगर त्याच्या एका हाताला घट्ट पकडून बसतो.
advertisement
हे पाहून दोन तरुण त्या व्यक्तीच्या दिशेनं जातात आणि त्याच्या हातावरील अजगर बाजूला काढतात. या दरम्यान अजगर पकडणारी व्यक्ती अगदी शांत उभा राहाते. अजगराच्या हल्ल्याची त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती नाही. दोघांनी त्या व्यक्तीच्या हातावरील अजगर काढताच तो अजगर पुन्हा पूर्ण ताकदीने त्या व्यक्तीच्या दुसऱ्या हाताला घट्ट पकडून बसतो. काही तरुणांनी पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या दुसऱ्या हातावरुन अजगराला काढलं.
Viral News: एका गोगलगायीने पालटलं महिलेचं नशीब; आता दर महिन्याला कमावते लाखो रूपये
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @mayankdabi नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 'सापांच्या भीतीने जंगल सोडू नका' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अजगराशी झुंज देणार्या व्यक्तीचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी या घटनेवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केलं असून अजगर पकडणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.