Viral News: एका गोगलगायीने पालटलं महिलेचं नशीब; आता दर महिन्याला कमावते लाखो रूपये

Last Updated:

क्रिसला आपल्या मुलाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असताना गोगलगायांमध्ये रस निर्माण झाला. तेव्हापासून तिने त्यांचं पालन करण्यास सुरुवात केली आणि ..

ही गोगलगाय प्रत्येकी 60 युरोपर्यंत विकली जाते
ही गोगलगाय प्रत्येकी 60 युरोपर्यंत विकली जाते
नवी दिल्ली 26 ऑगस्ट : पावसाळ्यात रस्त्यांवर, घरांवर आणि भिंतींवर अनेक गोगलगाय पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की या गोगलगायीच्या मदतीने तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. याचा खुलासा क्रिस बकली नावाच्या महिलेनं केला आहे. टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करून महिलेनं सांगितलं की, तिच्याकडे आफ्रिकेत पाच हजारांहून अधिक गोगलगाय आहेत. ज्यांच्यामुळे ती दरमहा लाखो रुपये कमवत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफ्रिकेची रहिवासी असलेली क्रिस एका खास प्रकारच्या गोगलगायीची शेती करते. ज्याचे शेल सुमारे 10 इंच असतात. त्यांना आफ्रिकन लँड स्नेल्स म्हणतात. जर्मनीत राहणाऱ्या क्रिसला आपल्या मुलाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असताना गोगलगायांमध्ये रस निर्माण झाला. तेव्हापासून तिने त्यांचं पालन करण्यास सुरुवात केली आणि यामुळे तिला सध्या कोणत्याही प्रकारचं काम करण्याची गरज नाही.
advertisement
आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना तिने सांगितलं की, तिच्याकडील प्रत्येक गोगलगाय जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ही गोगलगाय प्रत्येकी 60 युरोपर्यंत आरामात विकली जाते. तिला हॉस्पिटलमध्येच गोगलगाय आवडायला लागली आणि मग तिने बाजारातून 60 युरोला एक गोगलगाय विकत घेतली.
advertisement
हळूहळू लोकांना तिची ही गोगलगाय आवडू लागली आणि त्यामुळे तिच्या मनात त्याबद्दलची कल्पना आली आणि आज तिच्या खास प्रकारच्या 5000 अधिक गोगलगायी आहेत. तिच्या व्हिडिओंमध्ये ती अनेकदा लोकांना सांगते, की तिच्या या कल्पनेनं आज तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. एक काळ असा होता जेव्हा तिच्याकडे पैसेही नसायचे, पण आज तिच्या या कल्पनेमुळे तिच्याकडे इतके पैसे आहेत की ती आरामात जीवन जगत आहे. यासोबतच तिने या व्यवसायात तीन लोकांना कामावर ठेवलं आहे. ज्यांचा पगार कोणत्याही चांगल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यापेक्षा चांगला आहे.
मराठी बातम्या/Viral/
Viral News: एका गोगलगायीने पालटलं महिलेचं नशीब; आता दर महिन्याला कमावते लाखो रूपये
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement