संशोधकांनी प्रथमच वेगवेगळ्या माकडांच्या आणि वानरांच्या संपूर्ण वंशावळीचे परीक्षण केलं आहे. कोणते प्राणी सौम्य तोंडाशी संपर्क साधतात आणि ही सवय किती जुनी आहे हे ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञ डॉ. मॅटिल्डा ब्रिंडल म्हणतात , "चुंबनाला इतक्या व्यापक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला आहे."
किसचा अभ्यास केला कसा?
प्राण्यांमध्ये चुंबन कसं ओळखायचं हे सर्वात कठीण काम होतं. प्राण्यांमध्ये चुंबनासारख्या हालचाली अचूकपणे ओळखण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर होतं. कारण कधीकधी प्राणी तोंडाला स्पर्श करतात, पण ते चुंबन नसतं. म्हणून त्यांनी एक सोपी व्याख्या तयार केली, “हळूवार, शांत तोंडाशी संपर्क ज्यामध्ये एका तोंडातून दुसऱ्या तोंडात अन्न टाकणं नसणं." या व्याख्येच्या आधारे, त्यांनी सर्व मोठ्या वानरांचा अभ्यास केला.
advertisement
Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?
त्यांनी एक अनोखी गणिती पद्धत वापरली, प्रत्येक पूर्वज चुंबन घेण्याची शक्यता किती आहे हे समजून घेण्यासाठी 10 दशलक्ष वेगवेगळ्या परिस्थितींची गणना केली. "अशा प्रकारचे वर्तन हाडांमध्ये आढळत नाही, पण आधुनिक ज्ञान आणि विज्ञान एकत्र करून, आपण आपले प्राचीन पूर्वज काय करत होते याचा अंदाज लावू शकतो," असं ऑक्सफर्डचे प्राध्यापक स्टुअर्ट वेस्ट म्हणतात.
पहिलं किस कुणी कुणाला केलं?
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात चुंबनाबद्दल मनोरंजक गोष्टी समोर आल्या आहेत. 21 दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकन वानरांच्या पूर्वजांमध्ये पहिलं किसिंग झालं. चिम्पांझी, बोनोबोस आणि ऑरंगुटन्ससारखे प्राइमेट्स यांच्यात आजही हे वर्तन दिसतं.
ऐन हनीमूनमध्ये मासिक पाळी आली, पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवू शकतो का?
संशोधनानुसार यानंतर मानवांचे पूर्वज निअँडरथल्स यांनी 21 दशलक्ष वर्षांपूर्वी पहिल्यांदाच चुंबन घेतलं. निअँडरथल्स, जी मानवांच्या अगदी जवळची पण आता नामशेष झालेली प्रजाती आहे , त्यांनी चुंबन घेतलं आणि मानवांसोबतही असं केलं असावं. पूर्वीच्या संशोधनातून असं दिसून आलं होतं की निअँडरथल्स आणि मानवांच्या तोंडातील बॅक्टेरिया समान होते. यावरून दोघांमध्ये काही जवळचा संपर्क असल्याचं सूचित होतं. शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की मानव आणि निअँडरथल्सना एकमेकांपासून मुलंदेखील झाली. म्हणूनच असं मानलं जातं की चुंबन त्यांच्या नातेसंबंधांचा एक सामान्य भाग असावा.
