ऐन हनीमूनमध्ये मासिक पाळी आली, पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवू शकतो का?

Last Updated:

Physical relation in menstrual period : लग्नाचा हा काळ संपतो आणि मग पाळीचे दिवस कधी येतात ते कळतच नाही. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहिली तो क्षण आला असतानाही त्याचा आनंद घेऊ शकत नाही असं अनेकांना वाटतं. याबाबत डॉक्टर काय सांगतात?

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : लग्न ठरल्यापासून कित्येक कपल्सना प्रतीक्षा असते ती लग्नाच्या पहिल्या रात्रीची किंवा हनीमूनची.  दोघंही एकमेकांच्या आणखी जवळ येण्याचा हा क्षण. ज्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. पण याच काळात मासिक पाळी किंवा पीरियड्स आले तर... मग शारीरिक संबंध ठेवू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
लग्नाच्या कालावधीत मासिक पाळी येऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. म्हणजे पाळी थोडी लवकर आधी किंवा नंतर येण्यासाठी प्रयत्न केले जातात. लग्नाचा हा काळ संपतो आणि मग पाळीचे दिवस कधी येतात ते कळतच नाही. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहिली तो क्षण आला असतानाही त्याचा आनंद घेऊ शकत नाही असं अनेकांना वाटतं. याबाबत डॉक्टर काय सांगतात?
advertisement
पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवू शकतो की नाही, याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा जैन यांनी माहिती दिली आहे. डॉ. अपर्णा जैन म्हणाल्या, पीरियड्समध्ये शारीरिक संबंध वैद्यकीय दृष्टीकोनातून बघाल तर सुरक्षित आहे. पण ही पर्सनल चॉईस आहे. काही कपल्सना कन्फर्टेबल वाटतं काहींना नाही. जर काही वैद्यकीय समस्या असेल तर हा वैयक्तिक निर्णय असावा. प्रत्येक कपल ते यासाठी तयार असतील तर एकमेकांशी बोलूनच याबाबत निर्णय घ्यावा.
advertisement
मासिक पाळीच्या कालावधीत यावेळी युटेरस किंवा सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाचं मुख थोडं खुलं असतं, त्यामुळे इन्फेक्शनचा धोका थोडा वाढतो. त्यामुळे या कालावधीत शारीरिक संबंध ठेवताना हायजिनची काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही डॉ. अपर्णा जैन यांनी दिला आहे.
मासिक पाळीत पुरुषांना संसर्गाचा धोका
संक्रमणाचा वाढलेला धोका: मासिक पाळीत महिलांच्या गर्भाशयाचे मुख थोडे उघडे असते. यामुळे सामान्य दिवसांपेक्षा जिवाणू आणि इतर जंतूंना गर्भाशयात प्रवेश करणे सोपे जाते. यामुळे पुरुषांना संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.
advertisement
मासिक पाळीचे रक्त आणि संसर्ग : मासिक पाळीचे रक्त हे लैंगिक संक्रमित रोगांचे (STIs) वाहक असू शकते. जर महिला जोडीदाराला आधीपासून कोणताही लैंगिक संसर्ग असेल, तर मासिक पाळीच्या रक्ताच्या संपर्कातून पुरुषाला तो संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
advertisement
एचआयव्ही आणि हेपेटायटिसचा धोका: एचआयव्ही आणि हेपेटायटिस बी सारख्या गंभीर लैंगिक संक्रमित आजारांचे विषाणू रक्तामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे, मासिक पाळीत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.
स्वच्छतेचा अभाव: लैंगिक संबंध ठेवताना आणि नंतर स्वच्छता न राखल्यास, महिला आणि पुरुष दोघांनाही संसर्ग होऊ शकतो. स्वच्छतेच्या अभावामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ऐन हनीमूनमध्ये मासिक पाळी आली, पीरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवू शकतो का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement