लोहार चाळ हे रंगीबेरंगी आणि आकर्षक लाइटिंग खरेदीसाठी हॉटस्पॉट बनलं आहे. मंगलदास बिल्डिंग नंबर 5, तिसरा मजला, किचन गार्डन लेन या ठिकाणी गणपतीच्या डेकोरेशनसाठी आवश्यक असलेल्या लाइटिंगच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. येथे एलईडी लाइट्स, झुंबर, रंग बदलणाऱ्या लाईटच्या माळा, लाईटचे ओम आणि लाईटचे गणपती फेस इत्यादी साहित्य अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे.
advertisement
या ठिकाणी लाइटिंगची किंमत अवघ्या 40 रुपयांपासून सुरू होते. 10 ते 20 मीटर लांबीच्या एलईडी लाइट्स 40 ते 190 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. विविध रंग आणि पॅटर्नमध्ये डेकोरेटिव्ह झालर आणि कलर-चेंजिंग लाइट्स मिळतात. लाइटिंग समईची 95 ते 335 रुपयांपर्यंत मिळत आहे. याशिवाय येथे लहान झुंबर 60 रुपयांपासून तर मोठे झुंबर 200 ते 1400 पर्यंत मिळतात.
बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक 'गणपती फेस' लाइट 600 रुपयांमध्ये आणि 'ओम' लाइट 300 रुपयांमध्ये मिळत आहे. विघ्नहर्ता, मोरया, गणपती बाप्पा अशा अक्षरांची झगमगती लाइटिंग 600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सात रंगांनी उजळणारी 'सेव्हन कलर लाइटिंग' 650 रुपयांना मिळत आहे. या ठिकाणी लाइटिंगचे 30 ते 40 प्रकार उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.