TRENDING:

अरे हिला आवरा! तरुणीने कुत्र्यासोबत नको तेच केलं; घृणास्पद कृत्याचा VIDEO VIRAL

Last Updated:

Girl with Dog Video viral : नुकताच एका मुलीने बनवलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने घृणास्पद कृत्य केले आहे, की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सोशल मीडियाने लोकांमध्ये फेमस होण्याची अशी क्रेझ निर्माण केली आहे की काहीही करून त्यांना चर्चेत राहायचं आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काय काय नाही करत. ते काय करत आहेत, त्याचा विचारही करत नाहीत. नुकतंच एका मुलीनेही असेच काही रील बनवले. जो पाहून लोक भडकले आहेत. व्हिडीओ पाहणं दूर ऐकूनच तुमचं मन विचलित होईल.
News18
News18
advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून, तुम्ही कंटेंट क्रिएटर्स मर्यादा ओलांडत रील बनवताना पाहत असाल. मुलं-मुली उघडपणे आक्षेपार्ह मजकूर तयार करत आहेत, त्याचा तरुण प्रेक्षकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचारही ते करत नाहीत. आता या मुलीने शेअर केलेला व्हिडीओ पाहा. या मुलीने असं काही केलं की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. एका मादी कुत्र्यासोबत तिनं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं.

advertisement

सगळे वाट पाहत होते पण वरात आली नाही; नवरीच्या वडिलांनी फोन केला, कारण समजताच धक्का

@JaikyYadav16 या ट्विटर अकाऊंटवर या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही मुलगी रील बनवण्यासाठी कुत्र्याचं दूध पीत आहे. व्हिडीओ इतका वाईट आहे की आम्ही तुम्हाला तो दाखवूही शकत नाही. त्यामुळे बातमीचा फोटोदेखील आम्ही ब्लर केला आहे.

advertisement

या पोस्टवर कमेंट करताना एका युझरने मुलीचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओवर सामान्यपणे लोकांची दोन मतं असतात. कुणाला व्हिडीओ चांगले वाटतात तर कुणाला ते बिलकुल आवडत नाहीत. या मुलीच्या कृतीकडे तुम्ही कसंही बघितलं तरी प्रत्येक परिस्थितीत ती अयोग्य वाटते. तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

डोकं खाली आणि पाय... Chemistry शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली भन्नाट पद्धत, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या मुलीवर सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युझरने म्हटलं की, रीलने लोकांची तर्कशुद्धता नष्ट केली आहे. तर एका युझरने स्वस्त प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ बनवतात, असं म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर पेटा ते पोलीस सगळ्यांना टॅग करून या मुलीला अटक करण्याची मागणी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
अरे हिला आवरा! तरुणीने कुत्र्यासोबत नको तेच केलं; घृणास्पद कृत्याचा VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल