एका कपलचा हा व्हिडीओ आहे, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोघंही देवाकडे प्रार्थना करत आहेत. तरुण तरुणीला बोलतो की तुला जे हवं आहे ते देवाकडे माग." यानंतर मुलगी लगेच हात जोडते आणि देवाला म्हणते, "देवा जर तो माझा नसेल तर त्याला तुझा बनव."
घो मला असला हवा! तरुणी शोधतेय नवरा; चांगलं स्थळ सुचवणार, त्याला 2 कोटी मिळणार
advertisement
यानंतर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'आये जी मंगल भवन अमंगल हरी' वाजायला सुरुवात होतं. मुलाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. देवाचं आवडतं बनणं म्हणजे ती अप्रत्यक्षरित्या मृत्यूचीच प्रार्थना करते. मुलीने प्रार्थना केली आहे की जर मुलगा तिचा झाला नाही तर त्याने मरावं.
एरवी तुम्हाला हा डायलॉग माहिती आहे तू माझी नाही झालीस तर तुला कुणाचीच नाही होऊ देणार. पण या मुलीने तर हाइटच केली. तिने आपला बॉयफ्रेंड आपला नाही होणार तर थेट देवाकडेच पाठवण्याची सोय केली.
माझी बायको! नवऱ्यांनी पोस्ट केले पत्नींचे फोटो, पाहून पोलीसही शॉक, फेसबुक ग्रुपच बंद केला, पण का?
हा व्हिडिओ @user_vishuuuu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. अनेक युझर्सनी मुलीची प्रार्थना योग्य असल्याचं म्हटलं आहे. ही उत्तम कल्पना आहे, भावाची सेटिंग लावलेली आहे, अशा कमेंटही इतर युझर्सनी केल्या आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
सूचना : हा लेख फक्त व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देशही न्यूज18मराठीचा नाही.