आजच्या डिजिटल जगात, डेटिंग करणं पूर्वीपेक्षा जास्त कठीण झालं आहे. डेटिंग अॅप्स आता पूर्वीइतके मजेदार राहिलेले नाहीत. इन्स्टाग्राम डीएम आता सुरक्षित वाटत नाहीत आणि लोक आता 'वास्तविक जीवनात' एकमेकांना भेटण्याचा प्रयत्नही करत नाहीत. न्यू यॉर्कसारख्या मोठ्या शहरांमधील अविवाहित लोक म्हणतात की डेटिंग त्याच्या सर्वात कठीण टप्प्यात पोहोचली आहे. यामुळे मॅनहॅटनच्या मिडटाउन परिसरात लोक आजपर्यंत विचित्र गोष्टी करत आहेत.
advertisement
कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू
न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटच्या अहवालानुसार, सोशल मीडिया युझर निकोल ऑर (@nicoleee461) असा दावा करतो की काही अविवाहित महिला ऑफिसच्या वेळेत लंच स्पॉट्सवर जातात आणि वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांकडून सॅलड ऑर्डर चोरतात आणि नंतर त्या ऑर्डरवर लिहिलेल्या नावाने लिंक्डइनवर त्यांना शोधतात आणि त्यांना मेसेज करतात. त्या अनेकदा त्यांच्या मेसेजमध्ये असे लिहितात, "हेलो, ओ गॉड, मला माफ करा, मी चुकून तुमचं सॅलड उचललं. मला तुम्हाला एक नवीन सॅलड खरेदी करू दे."
निकोलने सोशल मीडियावरील व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "इथं डेटिंग करणं खूप कठीण झालं आहे" आणि विचारलं आहं, "पुरुष बारमध्ये येऊन थेट का बोलू शकत नाहीत? आपल्याला सॅलड चोरण्यास का भाग पाडलं जातं?"
हनीमूनसाठी आसुसलेला नवरदेव! सकाळी कोर्टात लग्न, पहिल्याच रात्री मृत्यू, नेमकं काय घडलं?
तथापि, आतापर्यंत अशी कोणतीही महिला पुढे आलेली नाही जिने अशा प्रकारे एखाद्याला डेट करायला सुरुवात केली आहे, परंतु हा ट्रेंड सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता प्रश्न असा आहे की, एखाद्याचे 20 डॉलर्सचं जेवण चोरणं हा खरोखर प्रेम मिळवण्याचा योग्य मार्ग आहे का? याबाबत न्यूयॉर्क पोस्टच्या सर्वेक्षणातील बहुतेक लोकांचं मत होत. "हो, लोकांना एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी बोलायला हवे असते, फक्त ते भयानक किंवा अस्वस्थ करणारं नसावं,"
एक 33 वर्षीय महिला म्हणाली, "मला असं वाटतं की हे अधिक वेळा घडावं. आजकाल ते हरवलेल्या कलेसारखं वाटतं." एक 28 वर्षीय पुरुष म्हणाला, "जेव्हा एखादी मुलगी तुमच्याशी बोलते तेव्हा ते चांगलं वाटतं, जरी मी ते स्वतः करत नसलो तरीही." बरेच पुरुष भीतीमुळे असं करत नाहीत. डेटिंग कोच ब्लेन अँडरसन यांच्या मते, "53% पुरुषांचा असा विश्वास आहे की ते महिलांशी बोलणं टाळतात कारण त्यांना भीतीदायक किंवा भयानक दिसण्याची भीती असते."