लग्नमंडप सजला होता, लाइट्स चमकत होत्या, बँडबाजा वाजत होता. नवरदेव स्टेजवर होता वधूकडे प्रेमाने पाहत होता. तेवढ्यात त्याचा धाकटा भाऊ आला आणि त्याने त्याला काही फोटो दाखवले. ते पाहून नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. फोटो होता नवरीबाईचा. ज्यात ती वेस्टर्न कपड्यांमध्ये होती. फोटोमध्ये तीच मुलगी होती जी व्हिडीओत लेहेंगा घालून उभी होती, पण फोटोमध्ये तिने टाईट वेस्टर्न ड्रेस, स्लीव्हलेस टॉप, हाय हील्स, लिपस्टिक लावलेलं होतं.
advertisement
@imadarshmishraa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेव मुलीचे फोटो दाखवतो आणि म्हणतो अशी सून कोणत्या सासूसासऱ्यांना आवडेल. असे कपडे कोण घालतं?
वधूने सर्व फोटो जुने असल्याचा दावा केला पण तिचं एक स्टेटस तीन दिवसांपूर्वीचा असल्याचं निष्पन्न झालं. सासरच्यांनीही लग्नाला नकार दिला. या गोंधळाचा व्हिडिओ समोर येताच तो व्हायरल झाला. लोकांनी त्यावर विविध प्रकारे कमेंट करायला सुरुवात केली. काहींनी मुलाला पाठिंबा दिला, तर काहींनी ते चुकीचं म्हटलं. काहींच्या मते जर मुलगी वेस्टर्न कपडे घालत असेल तर काय? यासाठी लग्न रद्द करायला नको होतं, असं म्हटलं आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंटमध्ये सांगा.
