ताजमहलमध्ये असं काही घडलं की पर्यटक, पोलीस जीव मुठीत धरून पळू लागले. ताजमहलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रविवार असल्याने ताजमहलमध्ये मोठी गर्दी होती. पर्यटक परिसरात फिरत होते. अचानक तिथं मधमाश्या आल्या. मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
Metro Train : मेट्रो ट्रॅकच्या पिलरवर नंबर का असतात? याचा फायदा काय?
advertisement
सर्वजण जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. कुणी कपड्याने आपलं तोंड झाकून घेत होतं, कुणी मधमाश्या नाहीत अशा ठिकाणी लपत होतं. तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनाही जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं.
मधमाश्यांच्या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्याच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले.
अलीकडेच ताजमहलच्या मुख्य घुमटावरील कमानीमध्ये मधमाश्यांनी पोळं बनवलं होते. एएसआय अधिकाऱ्यांनी पोळं काढून टाकलं. रॉयल गेटवर मधमाश्यांनी आणखी एक पोळा बनवला होता. रविवारी दुपारी जोरदार वारे वाहू लागले तेव्हा मधमाश्या उडू लागल्या.
एएसआयचे सहाय्यक संरक्षण अधिकारी प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितलं की, मधमाश्यांचं पोळं रॉयल गेटच्या वर छताला लटकलेलं होतं. याला फक्त दोन ते तीनच दिवस झाले होते. पण ते इतकं मोठं होतं की जास्त वजनामुळे तुटलं आणि खाली पडलं. मधमाश्या हवेत उडताच लगेच बेरिकेंडिंग गेट बंद करण्यात आला.