बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत. पहिला नैसर्गिक कापूर आणि दुसरा कृत्रिम कापूर जो कारखान्यांमध्ये तयार केला जातो. नैसर्गिक कापूर कॅम्फोर ट्री नावाच्या झाडापासून मिळवला जातो, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या Cinnamomum Camphora म्हणून ओळखला जातो. हे कापूर झाड अंदाजे 50 ते 60 फूट उंच आणि त्याची पानं गोलाकार आणि सुमारे 4 इंच रुंद असू शकतात.
advertisement
Puja Coconut : पूजेचा नारळ खराब झाला तर काय होतं? हे कसले संकेत?
कापूरच्या झाडाला काळं सोनं असंही म्हणतात. ते जगातील सर्वात मौल्यवान झाडांपैकी एक मानलं जातं. या झाडाचा वापर केवळ धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा कापूरच नाही तर आवश्यक तेल, विविध औषधं, परफ्यूम आणि साबण यांसारखी अनेक उपयुक्त उत्पादनंदेखील बनवण्यासाठी केला जातो. कापूरच्या झाडामध्ये केमोटाइप्स नावाची सहा विशिष्ट रसायने आढळतात. हे केमोटाइप्स आहेत: कापूर, लिनालूल, 1.8-सिनिओल, नेरोलिडॉल, सॅफरोल आणि बोर्निओल.
कापूर वृक्ष कुठे आहे?
कापूर वृक्ष प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये, विशेषतः चीनमध्ये उगम पावला असं मानलं जातं. पण काही वनस्पतिशास्त्रज्ञांचं मत आहे की ते मूळचं जपानचे आहे. चीनमध्ये तांग राजवंशाच्या काळात कापूर वृक्ष वापरून बनवलेला एक प्रकारचा आइस्क्रीम खूप लोकप्रिय होता. शिवाय या झाडाचा वापर इतर अनेक प्रकारे केला जात असे. चिनी लोक औषधांमध्येही त्याचा वापर विविध प्रकारे केला जात असे. नवव्या शतकाच्या सुमारास कापूर वृक्षापासून कापूर बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि हळूहळू ती जगभरात लोकप्रिय झाली.
आकाशातील आतषबाजी पाहत होते आणि गेला जीव, एकाच वेळी 60 लोकांचा मृत्यू; असं काय घडलं?
goya.in च्या एका अहवालानुसार, अठराव्या शतकापर्यंत फॉर्मोसा प्रजासत्ताक जे आता तैवान म्हणून ओळखलं जातं हे कापूर वृक्षांचं सर्वात मोठे उत्पादक होते. त्यावेळी फॉर्मोसा किंग राजवंशाच्या नियंत्रणाखाली होता. या राजवंशाने फॉर्मोसाच्या जंगलांवर मक्तेदारी स्थापित केली, ज्यामध्ये कापूरचाही समावेश होता. त्यांच्या परवानगीशिवाय झाडांना स्पर्श करणंदेखील एक दंडनीय गुन्हा होता, ज्याची शिक्षा कठोर होती. 1720 मध्ये नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 200 लोकांचा शिरच्छेद करण्यात आला. 1868 मध्ये ही मक्तेदारी संपली. पण 1899 मध्ये जपानने बेटावर कब्जा केला तेव्हा त्यांनी किंग राजवंशाने लादलेल्या मक्तेदारीसारखीच मक्तेदारी लादली. हा तो काळ होता जेव्हा कृत्रिम कापूरचा शोध पहिल्यांदा लागला.
भारतात कसा आला कापूर?
याच सुमारास भारतदेखील कापूर उत्पादनावर काम करत होता. 1932 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन पत्रात कलकत्ता येथील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनचे आर.एन. चोप्रा आणि बी. मुखर्जी यांनी नमूद केलं की 1882-83 दरम्यान लखनौच्या हॉर्टिकल्चर गार्डमध्ये बागेत कापूर उत्पादक झाडांची लागवड करण्यात यश मिळालं. पण हे यश अल्पकाळ टिकलं. प्रयत्न चालू राहिले आणि पुढील वर्षांत देशातील अनेक भागात कापूर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
झाडापासून कापूर कसा बनवतात?
कापूर प्रत्यक्षात कॅम्फोर झाडाच्या सालीपासून बनवलं जातं. जेव्हा कापूरची साल सुकू लागते किंवा राखाडी होते, तेव्हा ती झाडावरून काढून टाकली जाते. नंतर ही साल गरम केली जाते, शुद्ध केली जाते आणि नंतर पावडरमध्ये बारीक केली जाते. शेवटी, गरजेनुसार ती विविध आकारात बनवले जाते.
कापूर लगेच का पेटतो?
कापूरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे त्याचे प्रज्वलन तापमान खूप कमी असतं. याचा अर्थ असा की थोडीशी उष्णता मिळाल्यावरही ते जळू लागतं. शिवाय, कापूर हा एक अत्यंत अस्थिर पदार्थ आहे. कापूर थोडासाही गरम केला की त्याची वाफ हवेत वेगाने पसरते आणि वातावरणातील ऑक्सिजनशी एकत्र आल्यावर ती खूप सहजपणे पेटते.