TRENDING:

मानवी दातांचा इतिहास शोधत होते शास्त्रज्ञ, उघड झालं शॉकिंग रहस्य, त्यांचा वेगळाच उपयोग

Last Updated:

Teeth History : शिकागो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 465 दशलक्ष वर्षे जुन्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर दातांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  मानवांना जैविकदृष्ट्या उत्क्रांत होण्यासाठी लाखो वर्षे लागली. मानव पृथ्वीवर येऊन काही दशलक्ष वर्षे झाली असली तरी, त्यांच्या विकास प्रक्रियेचा पाया जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच असल्याचं मानलं जातं. मानवी शरीराचा प्रत्येक भाग प्रथम कोणत्या जीवात विकसित झाला आणि त्याने सध्याचा आकार कसा घेतला? उत्क्रांतीचा हा क्रम जाणून घेऊन, शास्त्रज्ञ मानवांचे अनेक प्रकारचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मानवी दातांच्या इतिहासाबद्दल शास्त्रज्ञांनी एक मनोरंजक खुलासा केला आहे.
News18
News18
advertisement

शास्त्रज्ञांनी असा दावा आहे की दातांचा आतील थर जो संवेदनशील म्हणून ओळखला जातो, तो प्राचीन माशांमध्ये वेगळ्या कार्यासाठी विकसित झाला. दात प्रथम माशांमध्ये विकसित झाले आणि नंतर त्यांच्या वंशजांद्वारे आणि त्यांच्यापासून विकसित झालेल्या नवीन प्रजातींद्वारे दातांनी त्यांचा सध्याचा आकार आणि कार्य मानवापर्यंत स्वीकारलं.

हेडफोन, ब्लँकेट आणि बरंच काही... विमानातील या वस्तू तुम्ही फ्रीमध्ये घरी नेऊ शकता

advertisement

शिकागो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 465 दशलक्ष वर्षे जुन्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या दातांचा आतील थर ज्याला डेंटाइन असं म्हणतात तो प्राचीन माशांमध्ये वेगळ्या कार्यासाठी विकसित झाला. त्या काळात डेंटाइन चावण्यासाठी वापरले जात नव्हते.

डेंटाइनचे कार्य काय होतं?

तुम्हाला हे जाणून विचित्र वाटेल पण डेंटाइनचं कार्य माशांना पाण्यातील हालचाली आणि बदल जाणवण्यास मदत करणं होतं. प्राचीन माशांच्या बाहेरील कवचात डेंटाइनचे थर होते, जे दात नसून संवेदी उपकरणं होती. यामुळे माशांना त्यांच्या सभोवतालचा धोका समजण्यास मदत झाली. ते आजच्या प्राण्यांच्या कातडीसारखे किंवा अँटेनासारखे काम करत असे.

advertisement

Shocking! लिफ्टमध्ये अडकला मुलगा, वडिलांनी गमावला जीव, Heart Attack ने मृत्यू

शास्त्रज्ञांनी अगदी जुन्या जीवाश्मांचा अभ्यास केला. संशोधकांना हे पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी दोन्ही प्राण्यांमध्ये आढळले. त्यांना आढळलं की पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी प्राण्यांनी हे कवच वेगवेगळ्या प्रकारे विकसित केलं.

दात कसे आले आणि कसे विकसित झाले?

हा अभ्यास दात कसा विकसित झाला याबद्दल एक नवीन दृष्टीकोन प्रदान करतो. दातांच्या उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत आहेत. एक म्हणतो की दात प्रथम तोंडात तयार झाले आणि नंतर कवचावर दिसू लागले. दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने म्हटलं आहे की त्या मूळतः बाह्य संवेदी रचना होत्या ज्या नंतर दात बनल्या. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास दुसऱ्या सिद्धांताचे समर्थन करतो.

advertisement

याचा अर्थ डेंटाइन प्रथम प्राण्यांमध्ये विकसित झाले. त्यांचे काम आजूबाजूच्या हालचाली ओळखणं होतं.  नंतर ते चघळण्यासाठी वापरले जाऊ लागले आणि हळूहळू हाच मुख्य वापर बनला. संशोधकांनी हे सर्व कसं घडलं याचा एक लेखाजोखा तयार केला आणि त्याची तुलना प्राचीन प्राण्यांमध्ये दात किंवा तत्सम अवयवांच्या अस्तित्वावरील अलीकडील डेटाशी केली. अर्थात आजच्या मानवांच्या दातांवरून हे सांगणं अशक्य आहे की त्यांचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी झाला होता का?

advertisement

मराठी बातम्या/Viral/
मानवी दातांचा इतिहास शोधत होते शास्त्रज्ञ, उघड झालं शॉकिंग रहस्य, त्यांचा वेगळाच उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल