ब्रॅडली रॉबर्ट आणि क्रिस्टी चेन यांची पहिली भेट नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती आणि तीन महिन्यांनंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. 38 वर्षीय डॉसन घटस्फोटित होता. लग्नानंतर या कपलने एक नवीन घर खरेदी केले. ते दोघेही मेम्फिसमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नवीन घरात राहत होते.
यानंतर दोघांनीही वर्षाच्या अखेरीस हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला आणि जुलै 2022 मध्ये दोघंही हनीमूनला गेले. या हनिमूनचा खर्च गिफ्ट म्हणून मुलीच्या कुटुंबाने केला होता. ते हनीमूनसाठी फिजीला गेले होते.
advertisement
ऐकावं ते नवल! 18 वर्षांची तरुणी, गुगलच्या मदतीने प्रेग्नंट झाली, कसं काय?
9 जुलै रोजी रिसॉर्ट कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की हे कपल नाश्त्यासाठी आले नाही आणि ते दुपारचं जेवण करतानाही दिसले नाही. दुपारनंतर, जेव्हा हॉटेलचा एक कर्मचारी त्याच्या खोलीची तपासणी करण्यासाठी आला तेव्हा खोलीची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. खरंतर, या हॉटेल कर्मचाऱ्याला तिथे एक मृतदेह सापडला जो क्रिस्टेचा होता. हा मृतदेह खोलीच्या बाथरूममध्ये होता. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या आणि अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. डॉसन रूम मध्ये नव्हता.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एक दिवस आधी दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आलं. हॉटेलमधून बाहेर पडताना हे कपल वाद घालताना दिसलं. आता न्यायालयाने पतीला दोषी ठरवलं आहे आणि त्याला 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.