ऐकावं ते नवल! 18 वर्षांची तरुणी, गुगलच्या मदतीने प्रेग्नंट झाली, कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
'माय एक्स्ट्राऑर्डिनरी फॅमिली' या यूट्यूब चॅनल शोमध्ये महिलेने तिची कहाणी सांगितली, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : गुगलचा वापर आपण सगळेच लोक दररोज करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल एक 18 वर्षांची तरुणी चक्क गुगलच्या मदतीने प्रेग्नंट झाली आहे. एका महिलेने 18 व्या वर्षी गर्भवती राहण्याचा आणि मूल होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात महिलेला गुगलने पाठिंबा दिला. आता हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
या महिलेचं नाव काई स्लोबर्ट आहे. माय एक्स्ट्राऑर्डिनरी फॅमिली' या यूट्यूब चॅनल शोमध्ये महिलेने तिची कहाणी सांगितली, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काई म्हणते, "मी बेघर होते, तरीही मी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. मी इतर कोणालाही ही पद्धत अवलंबण्याचा सल्ला देणार नाही, पण मला मुलं आवडतात. म्हणून मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला."
advertisement
बाळाचा जन्म कसा झाला? या प्रश्नावर काई हसते आणि म्हणते, “मी गुगलवर फ्री स्पर्म डोनर शोधले आणि एक सापडला" अशाप्रकारे ती दोनदा गर्भवती राहिली. तिची पहिली मुलगी कॅडी आता 5 वर्षांची आहे आणि दुसरी मुलगी फेथ 3 वर्षांची आहे. त्याच वेळी, काई आणि डी यांचं लग्न होऊन 5 वर्षे झाली आहेत. काई कोणाशी लग्न करणार होती हे कोणालाही महत्त्वाचं नव्हतं, पण तिच्या पालकांना तिच्या गरोदरपणाची बातमी आवडली नाही.
advertisement
काई म्हणाली, कॅडीला जन्म देण्यापूर्वी मी प्रेग्नेंसी शेल्टरमध्ये एकटीच राहिली कारण त्यावेळी डी माझ्यासोबत नव्हती. मुलीच्या जन्मानंतरही काई बेघर राहिली, पण काही महिन्यांनंतर, डी तिच्या आयुष्यात आली आणि ते दोघंही एकत्र एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. आता दोघं एकत्र आल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं आहे.
काई पुढे म्हणाले की, कॅडी आणि फेथ यांना माहित आहे की त्यांचा जन्म दात्यांच्या पोटी झाला आहे आणि ते त्यांच्या दात्या भावंडांना 'डिब्लिंग्ज' म्हणतात.
advertisement
काई आणि डी अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात, जिथे लोक त्यांची प्रशंसा आणि टीका करतात. पण काई म्हणते, "आम्ही आता ते 18 वर्षांचे बेघर जोडपं नाही. आम्ही आयुष्याबद्दल खूप काही शिकलो आहोत."
काई आणि त्याची पत्नी डी, ज्यांना दोन मुली आहेत, ते आनंदी कुटुंब जगत आहेत. पण तिला एवढ्यावरच थांबायचं नाही. दोघांनाही आणखी दोन मुले हवी आहेत. "आम्ही एकाच वेळी गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहोत," काई म्हणते. "हे आमचे स्वप्न आहे."
Location :
Delhi
First Published :
March 27, 2025 11:52 AM IST