नवऱ्याकडच्या लोकांना मुलीकडच्या लोकांनी धरलं वेठीस
नवरदेवाच्या या नकारामुळे वधूपक्ष खूप संतापला आणि त्यांनी तिथेच गोंधळ घातला. रागाच्या भरात त्यांनी नवरदेव, त्याचे वडील आणि इतर वऱ्हाडी मंडळींना वेठीस धरले. या तणावाची माहिती मिळताच नादौती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवू लागले.
या प्रकरणावर पोलीस स्टेशन अधिकारी वीर सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी दोन्ही पक्षांशी बोलणी केली, पण त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत पोलीस केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. हे प्रकरण ग्रामीण भागातील असल्यामुळे पंचायत आणि समाजातील वडीलधारे पंच पटेल मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
एक फोन कॉल आणि नवरदेवाचे मन बदलले
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी वधूपक्षाने सुमारे 56 लाख रुपये खर्च केले होते. आता पंचायात हा निर्णय घेत आहे की, ही रक्कम नवरदेवाच्या पक्षाला परत करावी लागेल. या वादाचे कारण एक फोन कॉल असल्याचे सांगितले जात आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, लग्नाचे विधी सुरू असताना एका मुलीने नवरदेवाला त्याच्या मोबाईलवर कॉल केला होता, त्यानंतर त्याचे वर्तन बदलले आणि त्याने लग्नापासून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सध्या हे प्रकरण पंचायात स्तरावर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हे ही वाचा : इथे बापच करतो मुलीशी लग्न, आई बनते सवत! 'या' जमातीत आजही जिवंत आहे विचित्र प्रथा, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : सिनेमा स्टाईल मर्डर! 'रईस' सिनेमा पाहून चिरला मित्राचा गळा, बनवला व्हिडीओ अन् पाठवला भावाला, पुढे...