TRENDING:

बायकोला गोरं करायला गेला नवरा, नको तेच करून बसला, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

Last Updated:

Husband Wife News : बायकोला गोरं करण्यासाठी नवऱ्याने तिला असा फॉर्म्युला दिला की सगळे हादरले. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने नवऱ्याला फाशीचीच शिक्षा सुनावली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजमेर : सुंदर आणि गोरी बायको हवी अशी अपेक्षा कित्येक पुरुषांची असते. अशीच गोरी बायको असलेला नवरा. ज्याने आपल्या पत्नीला गोरं करण्यासाठी असं काही केलं की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. बायकोला गोरं करण्यासाठी नवऱ्याने तिला असा फॉर्म्युला दिला की सगळे हादरले. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने नवऱ्याला फाशीचीच शिक्षा सुनावली आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

राजस्थानच्या उदयपूरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. उदयपूर जिल्ह्यातील मावली एडीजे कोर्टात हे प्रकरण आलं होतं. किशनलाल उर्फ किशनदासला कोर्टाने मृत्यूदंड आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ मानलं आणि ही घटना मानवतेला लाजवणारी, संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी असल्याचं म्हटलं.

2 लग्न, खायला घातला समोसा, प्रेग्नंट झाल्या 2 बायका; एका पुरुषाचा मोठा कांड

advertisement

आता किशनलालचा गुन्हा काय तर त्याने बायकोला गोरं करण्यासाठी नको तेच केलं.  तपासात असं दिसून आलं की आरोपी त्याची पत्नी लक्ष्मीला तिच्या रंग आणि लठ्ठपणाबद्दल सतत टोमणे मारत असे. तिचा दररोज छळ करत असे. एकदा त्याने आपल्या पत्नीला एक केमिकल दिलं आणि ते लावल्याने ती गोरी होईल असं सांगितलं.

आपल्या पतीला गोरी बायको हवी आहे. त्याने दिलेलं हे केमिकल लावलं की आपण गोरी होऊ आणि आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण होईल. असाच विचार या पतिव्रता महिलेने केला. तिने डोळे  त्याने आपल्या पत्नीला असे सांगून फसवले की एक विशेष रसायन लावल्याने ती गोरी होईल. पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते रसायन तिच्या संपूर्ण शरीरावर लावलं. पण आरोपीने त्यानंतर जळत्या अगरबत्तीने तिला जाळलं. बाटलीतील उरलेले रसायनही जळत्या लक्ष्मीवर ओतलं. ज्यामुळे तिचा वेदनादायक मृत्यू झाला.

advertisement

एक वर्षाने लहान नवरा, बायकोला स्पर्श केला नाही, 6 महिने संबंधच ठेवले नाही, नात्याचा शेवट मृत्यू

निकाल देताना न्यायालयानं म्हटलं की, हा गुन्हा अत्यंत घृणास्पद आणि मानवतेवर कलंक आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही सौम्यता समाजाला धोकादायक संदेश देऊ शकते. न्यायालयाने आरोपी किशनलालला मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश दिला.

हा निर्णय न्यायालयांच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचं प्रतिबिंबित करतो. यावरून स्पष्ट संदेश जातो की महिलांवरील अमानुष गुन्ह्यांसाठी कायदा सर्वात कठोर शिक्षा देईल. ही केवळ एक शिक्षा नाही तर संपूर्ण समाजाला इशारा आहे की अशी विचारसरणी आणि असे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बायकोला गोरं करायला गेला नवरा, नको तेच करून बसला, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल