कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीचा तपास सुरू केला. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं होतं की ती नेहमीच मोबाईल फोनवर बोलत होती. ज्यासाठी तिला फटकारण्यात आलं आणि त्यानंतर ती घरातून पळून गेली.
फोन ट्रेसिंग करतात नवादा पोलिसांना प्रयागराजमध्ये तिचं लोकेशन सापडलं. महाबोधी एक्स्प्रेसमध्ये ती होती. आरपीएफ टीम महाबोधी एक्सप्रेसमध्ये पोहोचली तेव्हा ती बुरखा घातलेली आढळली. आरपीएफने व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांसह मुलीची ओळख पटवली आणि मुलीला चाइल्ड लाइनच्या स्वाधीन केलं आणि तिचं समुपदेशन केलं.
advertisement
मृत गर्लफ्रेंडचा मोबाईल वापरत होता बॉयफ्रेंड, 8 महिन्यांनंतर सापडला मृतदेह
चाइल्ड लाइन टीमने विद्यार्थिनीचे समुपदेशन केलं तेव्हा तिचं पाकिस्तानी कनेक्शन हळूहळू उघड झालं. मुलीने पोलिसांना सांगितलं की काही महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर पंजाबमधील एका मुलीशी मैत्री झाली. तिने दिल्लीला जाण्यासाठी ऑनलाइन ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. विद्यार्थिनीच्या फोनच्या तपासणीत असं दिसून आले की ती इन्स्टाग्रामवर एका पाकिस्तानी तरुणाशी सतत बोलत असे. ज्यावेळी पोलिसांनी तिला पकडलं तेव्हाही ती एका पाकिस्तानी तरुणाशी गप्पा मारत होती. पोलिसांचा आवाज ऐकून त्याने मुलीला अडवलं.
40 दिवसांत एकाच व्यक्तीला 13 वेळा चावला साप, खरंच असं होऊ शकतं का? विज्ञान काय सांगतं?
आता ही विद्यार्थीनी कोणत्या दहशतवादी संघटनेला बळी पडणार होती की आणखी काही बाब आहे याचा तपास सुरू आहे. शनिवारी स्थानिक आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कनेक्शनवर विद्यार्थ्याची कसून चौकशी केली. तथापि, आतापर्यंत गुप्तचर यंत्रणांना कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. ज्यामुळे ते कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत.