31 ऑक्टोबर 1970 रोजी झालेला हा रेल्वे अपघात. संध्याकाळी 7 वाजता, चेन्नई (तेव्हाचं मद्रास) येथील पेरांबूर रेल्वे स्टेशनवर कोचीन मेल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभी होती. ही ट्रेन दुरुस्तीसाठी थांबल्याचं सांगण्यात आलं. प्रवासी उतरत होते. त्याच ट्रॅकवरून वेगाने येणारी मद्रास-मंगलोर मेल मागून येऊन कोचीन एक्सप्रेसला धडकली. धडक इतकी जोरात होती की प्रवासी हवेत उडून इकडेतिकडे फेकले गेले. रक्तबंबाळ झालेले प्रवासी मदतीसाठी ओरडत होते.
advertisement
कोचीन मेलचे तीन डबे रुळावरून घसरले, तर मंगलोर मेलचे इंजिन आणि दोन डबे चक्काचूर झाले. अपघातानंतर चारही डबे धुराने वेढले गेले होते. संध्याकाळ झाल्यामुळे अंधार असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. जखमींना तात्काळ जवळच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये बहुतेक दक्षिण भारतातील विविध भागांतून परतणारे प्रवासी होते. यात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जण जखमी झाले.
मंगलोर मेल आणि कोचीन मेल केरळच्या किनारपट्टीच्या भागांना जोडतात. या गाड्या लाखो प्रवाशांना घेऊन जातात. अपघातामुळे झालेल्या व्यत्ययामुळे शेकडो गाड्या रद्द करण्यात आल्या किंवा वळवण्यात आल्या.
आकाशातील आतषबाजी पाहत होते आणि गेला जीव, एकाच वेळी 60 लोकांचा मृत्यू; असं काय घडलं?
दक्षिण रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. तपासात सिग्नल बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं निष्पन्न झालं. 1970 मध्ये दक्षिण रेल्वेवरील हा चौथा मोठा अपघात. मृतांच्या कुटुंबियांना 5000 रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली.
भारतातील आणखी 5 भीषण रेल्वे अपघात
बिहार रेल्वे अपघात (1981)
6 जून 1981 रोजी बिहारमध्ये घडलेला रेल्वे अपघात. 800 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन बागमती नदीवरील पूल ओलांडत असताना चक्रीवादळामुळे ती रुळावरून घसरली. ट्रेनचे सात डबे नदीत कोसळले, अंदाजे 500 ते 800 लोकांचा मृत्यू झाला. अनेक मृतदेह कधीच सापडले नाहीत.
फिरोजाबाद रेल्वे अपघात (1995)
20 ऑगस्ट 1995 रोजी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादजवळ पुरुषोत्तम एक्सप्रेस थांबलेल्या कालिंदी एक्सप्रेसशी धडकली होती. या अपघातात सुमारे 350 लोक मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले. सिग्नलमध्ये बिघाड आणि मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याचं मानलं जातं.
गॅसल ट्रेन घटना (1999)
2 ऑगस्ट 1999 रोजी पश्चिम बंगालमधील गॅसल स्टेशनजवळ ब्रह्मपुत्र मेल आणि अवध आसाम एक्सप्रेसमध्ये मोठी टक्कर झाली. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. सिग्नलमध्ये बिघाडामुळे हा अपघात झाला होता. यात 285 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि 300 हून अधिक जखमी झाले.
बिहारमधील राजधानी एक्स्प्रेस अपघात (2002)
सप्टेंबर 2002 मध्ये, कोलकाताहून नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील धावे नदीच्या पुलावरून जाताना अपघात झाला. ट्रेनचे अनेक डबे नदीत पडले आणि त्यात किमान 120 लोक मृत्युमुखी पडले. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेला तोडफोडीचं प्रकरण म्हटलं पण पूर्ण चौकशी कधीच झाली नाही.
ओडिशामधील बालासोर रेल्वे अपघात (2023)
2 जून 2023 रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताने देशाला हादरवून टाकलं. या अपघातात बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस आणि एक मालगाडीचा समावेश होता. कोरोमंडल एक्सप्रेस एका थांबलेल्या मालगाडीला धडकली, ज्यामुळे तिचे डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या ट्रेनला धडकले. या अपघातात 296 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 1200 हून अधिक लोक जखमी झाले.
