TRENDING:

IT कंपनीची मालकीण, कर्मचाऱ्याच्या प्रेमात! त्याच्यासाठी प्रॉपर्टी-कंपनीही गहाण ठेवली, लग्नानंतर भयानक शेवट

Last Updated:

पुरुष कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडलेल्या आयटी कंपनीच्या मालकीणीने त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं पण त्यांच्या प्रेमाचा लग्नानंतर धक्कादायक शेवट झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : प्रेम कधी कुठे कुणावर होईल सांगू शकत नाही. कित्येक लोकांचं प्रेम तर ऑफिसमध्ये जुळलेलं आहे. ऑफिसमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचं एकमेकांवर प्रेम होणं आणि त्यांनी लग्न करणं काही नवीन नाही. असे कितीतरी कपल आहेत. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही कंपनीची मालकीण चक्क पुरुष कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली आहे. त्याच्यासाठी तिनं सर्वस्व अर्पण केलं पण त्यांच्या प्रेमाचा लग्नानंतर धक्कादायक शेवट झाला.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

गुजरातमधील हे प्रकरण आहे. एक महिला आयटी कंपनी चालवत होती. तिच्याच कंपनीत काम करणारा एक पुरुष कर्मचारी ज्याच्या प्रेमात ती पडली. त्या दोघांनी लग्नही केलं. लग्नानंतर पतीनं बिझनेस करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेचं आपल्या पतीवर इतकं प्रेम की त्याच्यासाठी तिनं सर्वस्व दिलं. तिने त्याच्या बिझनेससाठी स्वतःची कंपनी, संपत्ती सगळं गहाण ठेवलं आणि त्याच्यासाठी कर्ज घेतलं. तिनं तब्बल 5 कोटी रुपये उभे केले. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.

advertisement

बड्या बिझनेसमनची लेक गरीबावर फिदा! प्रेमासाठी लाथाडली 2500 कोटींची संपत्ती; लग्नानंतर असं आयुष्य जगतेय

या महिलेने ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने आपल्या पतीविरोधात तक्रार केली होती. तक्रारीनंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तिनं केला. पोलीस ठाण्यातच ती फिनाईल प्यायली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

advertisement

महिलेने पतीनं आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आपली संपत्ती, पैसे हडप करून त्याने आपल्याला सोडून दिलं. पैसे घेऊन तो पळून गेल्याचं तिचं म्हणणं आहे.

बड्या बिझनेसमनच्या लेकीने प्रेमासाठी लाथाडली 2500 कोटींची संपत्ती

मलेशियातील बिझनेस टायकून खू के पेंग यांच्या मुलीची ही लव्ह स्टोरी. खू के पेंग कोरस हॉटेलचे संचालक आहेत. ते मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 44 व्या क्रमांकावर आहेत. अशा बड्या उद्योगपतीची मुलगी अँजेलिन फ्रान्सिस मात्र एका गरीबाच्या प्रेमात पडली. जेडिडिया फ्रान्सिस असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव. अँजेलिन ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना तिची भेट जेडेडियाशी झाली. दोघंही प्रेमात पडले.

advertisement

ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई

जेव्हा अँजेलिनने तिच्या कुटुंबाला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी ते नाकारलं. कारण अँजेलिनचा बॉयफ्रेंड सामान्य कुटुंबातून होता. त्यांन तिला धमकावलं, प्रेम तोडण्यास सांगितलं. पण अँजेलिनला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. जेव्हा वडिलांचा वारसा आणि बॉयफ्रेंड यांच्यातील एक काहीतरी निवडण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा तिनं बॉयफ्रेंडला निवडलं. संपत्ती आणि प्रेमात तिनं प्रेम निवडलं.

advertisement

बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी तिनं 300 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला. अँजेलिनने 2008 मध्ये जेदेडियाशी लग्न केलं. विलासी जीवन सोडून प्रेम निवडले. आता ती सर्वसामान्य आयुष्य जगते आहे.

मराठी बातम्या/Viral/
IT कंपनीची मालकीण, कर्मचाऱ्याच्या प्रेमात! त्याच्यासाठी प्रॉपर्टी-कंपनीही गहाण ठेवली, लग्नानंतर भयानक शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल