बड्या बिझनेसमनची लेक गरीबावर फिदा! प्रेमासाठी लाथाडली 2500 कोटींची संपत्ती; लग्नानंतर असं आयुष्य जगतेय

Last Updated:

श्रीमंत वडीलांची संपत्ती आणि गरीब तरुणाचं प्रेम यांच्यात एक निवडण्याची वेळ आली तेव्हा तिनं संपत्ती सोडून प्रेम निवडलं.

फोटो - angeline.rosieonfir
फोटो - angeline.rosieonfir
क्वालालांपूर : प्रेम कधी, कुठे, कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. प्रेमाला मर्यादाही नसतात. प्रेम आंधळं असतं. प्रेमात त्यागही करावा लागतो... प्रेमाबाबत असं बरचं काही म्हटलं जातं. प्रेमाच्या या अशा बऱ्याच व्याख्या प्रत्यक्षात दाखवणारी अशी ही लव्ह स्टोरी. एका बड्या बिझनेसमनची लेक एका गरीब तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिनं कोट्यवधींच्या संपत्तीवरही लाथ मारली.
ही लव्ह स्टोरी आहे मलेशियातील बिझनेस टायकून खू के पेंग आणि माजी मिस मलेशिया पॉलिन यांच्या मुलीची. खू के पेंग कोरस हॉटेलचे संचालक आहेत. ते मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 44 व्या क्रमांकावर आहेत. अशा बड्या उद्योगपतीची मुलगी अँजेलिन फ्रान्सिस मात्र एका गरीबाच्या प्रेमात पडली. जेडिडिया फ्रान्सिस असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव. अँजेलिन ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना तिची भेट जेडेडियाशी झाली. दोघंही प्रेमात पडले.
advertisement
जेव्हा अँजेलिनने तिच्या कुटुंबाला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी ते नाकारलं. कारण अँजेलिनचा बॉयफ्रेंड सामान्य कुटुंबातून होता. त्यांन तिला धमकावलं, प्रेम तोडण्यास सांगितलं. पण अँजेलिनला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. जेव्हा वडिलांचा वारसा आणि बॉयफ्रेंड यांच्यातील एक काहीतरी निवडण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा तिनं बॉयफ्रेंडला निवडलं. संपत्ती आणि प्रेमात तिनं प्रेम निवडलं.
advertisement
बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी तिनं 300 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला.  अँजेलिनने 2008 मध्ये जेदेडियाशी लग्न केलं. विलासी जीवन सोडून प्रेम निवडले. आता ती सर्वसामान्य आयुष्य जगते आहे.
advertisement
प्रेमासाठी एवढा त्याग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये जपानच्या राजकुमारी माकोनेही एका सामान्य व्यक्तीशी लग्न केलं होतं. कोमुरोआ असं त्याचं नाव. तो तिचा कॉलेजचा बॉयफ्रेंड आणि साधा माणूस होता. राजकुमारी माको ही जपानी सम्राटाची भाची , परंतु लग्नानंतर तिने प्रेमासाठी तिची पदवी सोडली.
मराठी बातम्या/Viral/
बड्या बिझनेसमनची लेक गरीबावर फिदा! प्रेमासाठी लाथाडली 2500 कोटींची संपत्ती; लग्नानंतर असं आयुष्य जगतेय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement