अशीसुद्धा एक सरकारी योजना? बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीला सरकारकडून मिळाले 83 लाख; कसे ते पाहा

Last Updated:

बॉयफ्रेंडने धोका देताच तरुणीनं असं काही केलं की सरकारकडून तिला पैसे मिळाले.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
वॉशिंग्टन : तुम्हाला प्रेमात धोका मिळाला तर तुम्ही काय कराल?... रडाल, भांडाल, चिडाल... काही लोक आयुष्याच्या त्याच टप्प्यावर अडकून राहतील. तर काही जण काही कालावधीने यातून बाहेर पडतील आणि आयुष्यात पुढे निघून जातील. दुसरा पार्टनर शोधतील. पण एका तरुणीने तिला तिच्या बॉयफ्रेंडने धोका दिल्यानंतर असं काही केलं की तिला सरकारकडून 83 लाख रुपये मिळाले आहेत.
अमेरिकेतील हे अजब प्रकरण आहे. एव्हा लुईस असं या तरुणीचं नाव आहे. तिच्या बॉयफ्रेंडने धोका दिल्यानंतर तिला सरकारने 83 लाख रुपये दिले आहेत. आता हे कसं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तरुणीनं प्रेमात झालेल्या तिच्या फसवणुकीची स्टोरी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट टिकटॉकवर सांगितली आहे. ज्यात तिनं तिला सरकारकडून पैसे कसे मिळाले हेसुद्धा सांगितलं.
advertisement
एव्हाने तिच्या बॉयफ्रेंडने तिला धोका दिल्यानंतर त्याला असंच सोडलं नाही. तिनं त्याचा बदला घेता.  पण तो असा की कुणी विचारही केला नसेल.  एव्हानं सांगितलं की रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या बॉयफ्रेंडनं तिला त्यानं केलेल्या टॅक्स चोरीबाबत सांगितलं होतं, जे एव्हानं लक्षात ठेवलं. त्यानं तिला धोका देताच तिनं त्याच्या त्याच चोरीचा फायदा घेतला.  यूएस एंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये तिनं आपल्या बॉयफ्रेंडची तक्कार दिली. यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं. आता त्याच्या टॅक्स चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. कदाचित त्याला जेलही होऊ शकते.
advertisement
एव्हाने बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी सरकारला त्याच्या टॅक्स चोरीची माहिती दिली. याचा तिला डबल फायदा झाला. एकतर बॉयफ्रेंडचा बदलाही घेतला आणि तिला सरकारने 100000 डॉलर्स म्हणजे तब्बल 83 रुपयांचं बक्षीस दिलं.
एव्हाला सरकारकडून व्हिसलब्लोअर अवॉर्ड मिळाला होता. अमेरिकेत आईआरएस व्हिसलब्लोअर अवॉर्डमार्फत त्या लोकांना फायनान्सिअल इन्सेटिव्ह मिळतो, जे महत्त्वाच्या करासंबंधी अवैध प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी विभागाला माहिती देतात. या पुरस्कारासाठी अट अशी असते की टॅक्स चोरीची रक्कम २ डॉलर दशलक्षपेक्षा अधिक असली पाहिजे आणि आरोपीचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी एका वार्षिक करासाठी 200000 डॉलरपेक्षा अधिक असावं. दिलेल्या माहितीच्या आधारे व्बबिसलब्लोअर्ससाठी बक्षीस आयआरएसने वसूल केलेल्या एकूण रकमेचया 15 ते 30 टक्के असतो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अशीसुद्धा एक सरकारी योजना? बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीला सरकारकडून मिळाले 83 लाख; कसे ते पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement