डासांना दूर ठेवण्याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही हा उपाय एकदा पाहाल, कराल आणि त्याचा परिणाम पाहाल तर पुन्हा पुन्हा तो कराल. आता नेमकं करायचं तरी काय ते पाहुयात.
Kitchen Jugaad Video : फ्रिजरखाली बांगडी टाकली आणि कमालच झाली
advertisement
इथं तुम्हाला पूर्ण नारळाचा वापर करायचा नाही आहे, तर नारळाच्या फक्त साली घ्यायच्या आहेत. ज्या आपण एरवी कचऱ्यात फेकून देतो. एका भांड्यात या सालींचे छोटे तुकडे करून घ्या. त्यात तमालपत्र, कडुलिंब सुकलेला किंवा ताजा ओला असेल तर उत्तम, याशिवाय कापूर आणि कांदा किंवा लसणीच्या साली किंवा पाचोळा यात टाका. यात थोडंसं तूप टाका. तूप नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला हवं तर तुम्ही यात कॉफी पावडरही टाकू शकता. आता हे सर्व एकत्र करून जाळा. हे जाळल्यानंतर घरात धूर होईल, यामुळे डास तर जातीलच पण घरातही सुगंध पसरेल आणि प्रसन्न वाटेल.
या वस्तू तुम्ही एकत्र करून एका डब्यात भरून ठेवा. जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे एका भांड्यात घेऊन वापरू शकता. यामुळे डास चावणं दूर घराच्या आसपासही फिरकणार नाहीत, असा दावा या गृहिणीने केला आहे.
Kitchen Jugaad Video : चमत्कारिक पाणी, यात देवपूजेची भांडी ठेवताच चकाचक होतील, घासायची गरजच नाही
पूर्वी कोणतंही केमिकल किंवा औषधं नव्हती त्यावेळी समस्यांवर असेच काही घरगुती उपाय केले जात असतं. असे उपाय फायद्याचे ठरतात आणि पैशांचीही बचत होते.
Puneri tadka युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
