किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
.
सामान्यपणे चपाती आपण पोळपाट तर काही जण किचनच्याच लादीवर लाटून बनवतात. पण तुम्हाला न लाटताही चपाती बनवली येते, असं सांगितलं तर, तेसुद्धा प्लॅस्टिक पिशवीवर. आता प्लॅस्टिक पिशवीवर चपाती न लाटता कशी काय बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चपाती बनण्याची ही सर्वात सोपी अशी ट्रिक आहे.
advertisement
तुम्हाला करायचं काय आहे?
प्लॅस्टिक पिशवी घ्या. त्या चौकोनी आकारत कापून घ्या. आता पिठाचे गोळे बनवून त्याला सुकं पीठ लावून घ्या. एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन त्यावर पिठाचा एक गोळा ठेवा. त्यावर दुसरी प्लॅस्टिक पिशवी ठेवून पिठाचा दुसरा गोळा ठेवा. असं एकावर एक प्लॅस्टिक पिशवी आणि पिठाचे गोळे ठेवून घ्या. शेवटी प्लॅस्टिकची एक पिशवी ठेवा.
आता या गोळ्यांवर एक ताट ठेवून हातांनी त्यावर दाब द्या. हलक्या हाताने दाब देत ताट हातानेच थोडं गोल फिरवा.
आता ताट उचलून पाहाल तर तुम्हाला चपात्या तयार झालेल्या दिसतील. अगदी काही सेकंदात एकाच वेळी कितीतरी चपात्या तुम्ही बनवू शकता.
Pal pal real vlog युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे ठेवा, परत आल्यावर दिसेल मोठा परिणाम
याआधीसुद्धा आम्ही न लाटता चपाती बनवण्याची एक ट्रिक दाखवली आहेत. यात तुम्हाला डोशासारखं गव्हाच्या पिठाचं बॅटर तयार करून ते तुम्हाला तव्यावर पसरवायचं आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही तपाती बनवू शकता.