Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे ठेवा, परत आल्यावर दिसेल मोठा परिणाम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : फ्रिजमध्ये पैसा ठेवण्याचा एक फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. फ्रिजमध्ये इतर सामानांसोबत पैसेही ठेवा. आता याचा काय फायदा होतो ते आपण व्हिडीओमध्ये पाहुयात.
नवी दिल्ली : बँक किंवा कपाट, पाकिट, गल्ला ही पैसे ठेवण्याची जागा. पण याशिवाय फ्रिजमध्येही एकदा पैसे ठेवून पाहा. फ्रिजमध्ये पैस ठेवण्याचा एक फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. फ्रिजमध्ये इतर सामानांसोबत पैसेही ठेवा. आता याचा काय फायदा होतो ते आपण व्हिडीओमध्ये पाहुयात.
फ्रीजमध्ये आपण लवकर खराब होतात अशा वस्तू ठेवतो. यात भाजी, दूध अशा वस्तूंचा समावेश आहे. पण फ्रीजमध्ये पैसे ठेवणंही फायदेशीर आहे. हे एका गृहिणीने दाखवलं आहे. विशेषत: घराबाहेर जाताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्हाला फ्रीजरमध्ये एका वाटीत पाणी भरून ठेवायचं आहे. पाण्याचा बर्फ जमवून घ्यायचा आहे. यात पैशांची नाणी ठेवायची आहेत.
advertisement
आता या नाण्याचा उपयोग काय? तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता त्यावेळी लाइट गेली की फ्रीजमधील वस्तू खराब होण्याचा धोका असतो. तुम्ही घरी येईपर्यंत कदाचित लाइट आलेली असते. लाइट गेली होती ते तुम्हाला समजत नाही. सर्व पदार्थ फ्रीजच्या तापमानाला आलेले असतात. त्यामुळे खराब होऊनही ते समजत नाही.
advertisement
तुम्ही बाहेरून आल्यावर फ्रीज मधील वाटीतील नाणं पाहा. वाटीतील पाणी वितळून नाणं खाली गेलं असेल तर याचा अर्थ लाइट गेली होती. यामुळे कोणते पदार्थ खराब झाले नाहीत ना हे चेक करून घ्या.
advertisement
Location :
Delhi
First Published :
June 23, 2025 3:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे ठेवा, परत आल्यावर दिसेल मोठा परिणाम